आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछत्रपती संभाजी महाराज यांची जयंती शनिवारी जालना शहरासह जिल्हाभरात साजरी करण्यात आली. शहरातील छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीच्या वतीने अभिवादन करण्यात आले. उपविभागीय अधिकारी संदीप सानप, मुख्याधिकारी नितीन नार्वेकर, स्मारक समितीचे मुख्य संघटक ज्ञानेश्वर ढोबळे, उपाध्यक्ष राजेश राऊत, सचिव विष्णू पाचफुले, पोलीस निरीक्षक सय्यद, राजेंद्र गोरे, गोपाल ठोंबरे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष विजय वाढेकर,दत्तात्रय खांडेभराड, वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेचे प्रा. सुदर्शन तारख, छावाचे जिल्हाध्यक्ष गणेश ढोबळे, महेश निक्कम यांची उपस्थिती होती. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, राष्ट्रमाता, राजमाता, जिजाऊ मॉ. साहेबांचा विजय असो. अशा गगनभेदी घोषणा देत संपूर्ण परिसर दणाणून सोडला.
या वेळी सिद्धार्थ देशमाने, दीपक वाघ, रतन जाधव, चंद्रकांत भोसले, राजकुमार दांडगे, गणेश भोंग, सुदर्शन शिंदे, तुषार चौधरी, गजानन फुलसुंदर, मच्छिंद्र म्हस्के, किशोर ढेकळे, बबलू वाकोडे, विजय फुलंब्रीकर, ज्ञानेश्वर पडोळ, सुहास मुंढे, सोमनाथ काबलिये, सुरज ढोबळे, शहाजी भोसले, जालिंदर ढोबळे, मारोती शेरकर, नंदकुमार वाघचौरे, महेंद्र वाघमारे यांच्यासह आदी उपस्थित होते.
वरुड बुद्रुक
वरुड बुद्रुक । जाफराबाद तालुक्यातील वरुड बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराज चौकात छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘छत्रपती संभाजी की जय बोलो, छत्रपती शिवाजीकी जय बोलो’ अशा गगनभेदी घोषणा देण्यात आल्या.
आष्टी
आष्टी । येथील छत्रपती शिवाजी महाराज नगरात छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस अंबादास पौळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सुनिल बागल, नारायण सोळंके, गोविंद बागल, सोमनाथ शेळके, कृष्णा बागल,विकास सोळंके, गणेश जाधव, अमोल शेंडगे, अभिजित जाधव, गोपाळ बागल, गजानन बागल, गणेश मोरे आदी उपस्थिती होते. तर धर्मवीर संभाजी राजे चौकात छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी राहुल आवटे, संदीप आवटे, संदीप घेणे, बाबासाहेब बगल, ओम राऊत, उद्धव डोळस, उमेश सोळंके, मदन कोल्हे, अभिजित चौरे, अरुण डोईजडकर, रामेश्वर काळे, अशोक गते, भागवत थोरात, विशाल थोरात, शंकर चव्हाण, गजानन आवटे, सुरेश थोरात, भागवत आगलावे, देवेंद्र आवटे यांच्यासह आदींची मोठी उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.