आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सण:सेलू शहरात रमजान ईदचा उत्साह, एकमेकांना शुभेच्छा देत सण साजरा

सेलूएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात मंगळवारी ३ मे रोजी मुस्लिम समाज बांधवांच्या पवित्र मानला जाणारा रमजान ईद उत्साहात साजरा करण्यात आली. सकाळी ८ वाजता ईदगाह मैदानावर ईदची नमाज पठण करण्यात आली. या वेळी मुस्लिम समाजबांधवांची अभूतपूर्व उपस्थिती होती. रमजान ईदबद्दल मौलाना सादेक साहब नदवी यांनी सखोल माहिती विषद केली.

या प्रसंगी मैलाना तजम्मुल अहेमद खान खासमी यांनी नमाझ पठण करून देशात सुख-शांतीसाठी प्रार्थना केली. ईदच्या नमाज नंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना गळा भेट देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या.

मुस्लिम समाजबांधवांना नमाज नंतर ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी या मैदान परिसरात मंडप लावून प्रशासनातील अधिकारी, विविध राजकीय पक्षांचे नेते मंडळी यांनी पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या. यावेळी उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार, तहसीलदार दिनेश झांपले, नायब तहसीलदार प्रशांत थारकर,साईबाबा नागरी बँकेचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर, मुकेश बोराडे, माजी नगराध्यक्ष विनोदराव बोराडे, जिल्हा परिषद सदस्य अशोकराव काकडे, डॉ. संजय रोडगे, प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णीसह इतर मान्यवरांची उपस्थिती होती.

रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलिस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बांधवांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ईदनिमित्त मुस्लिम बांधवांच्या निमंत्रणावरून अनेक हिंदू बांधवांनी भेट देऊन एकमेकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...