आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण:शेतकरी मेळाव्यातून चेअरमन सतीश घाडगेंनी केली राजकीय साखरपेरणी; नाव न घेता माजी मंत्री राजेश टोपेे यांच्यावर टीका

तीर्थपुरी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

घनसावंगी तालुक्यात साखर कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची पिळवणूक करण्यात येऊन त्यांचा कसा राजकीय वापर केला जातो, याविषयी समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाडगे यांनी तीर्थपुरी येथे शेतकरी मेळाव्यात नाव न घेता माजीमंत्री राजेश टोपे यांच्या कार्यशैलीवर चौफेर टीका करत आगामी काळात राजकारणात उतरण्याचे संकेत दिले.

तीन दिवसापुर्वी तीर्थपुरी येथील शिवतीर्थ मंगल कार्यालयात समृद्धी साखर कारखान्याच्या वतीने सभासद कार्ड वाटप व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना घाडगे म्हणाले की, कारखाना उभारताना माझे राजकीय असे कोणतेही आमदार-खासदार होण्याचे ध्येय नव्हते. टेक्निकलीसह अनेक अडचणी आणल्या, आमची टोळी टाकल्यावर रस्त्यात पाणी सोडणे, असे अनेक अपमान मी सहन केले. तरी मी शांत राहिलो. यावेळी मी ठरवले होते रडायचे नाही तर लढायचे, समृद्धी कारखाना सभासदांना दिवाळीला घरपोच ५० किलो साखर देणार आहे. तालुक्यातील इतर (समर्थचे नाव न घेता) साखर कारखाना सभासदांना साखर देतांना सिल्टिंग म्हणजे झाडून जमा केलेली साखर सभासदांना देण्यात येत असल्याचा आरोप घाडगे यांनी केला.

माझ्याकडे आता दोन कारखाने आहेत, भरपूर कमावले मी आता, माझ्याकडे गाड्या-बंगले झालेत, अजून कितीक पाहिजे, नाहीतर पोरं वेडे निघतील माझे.मी जो समृद्धी कारखाना उभा केला तो स्वकर्तुत्वाने उभा राहिलेला असून दुसरे जे कारखाने आहेत ते नशिबाने मिळवलेले कारखाने आहेत, हा दोन्हीतला फरक आहे. स्वकर्तुत्वाने जो माणूस पुढे जातो तो माणूस पुढे जातो त्याला कोणीही हरवू शकत नाही. अतिरिक्त ऊस झाल्याने या भागात येणाऱ्या इतर कारखान्याच्या टोळ्या फक्त मीपणामुळे या परिसरात आल्या नाहीत. गरज असल्यास चपला उचलायचा आणि गरज संपली की हा कश्या टोळ्या टाकतो हे पहायचे ही चुकीची गोस्ट आहे. पश्चिम महराष्ट्रात पांदण व शिवरस्ते झालेत आपल्याकडे ते होऊ दिले नाहीत.

आपल्याकडे मागे एक अधिकारी आला होता त्यांनी सम्पूर्ण गोदाकाठचे पांदण व शिवरस्ते करण्याचे ठरविले होते. परंतु इथल्या लोकप्रतिनिधीने आपली सर्व ताकद लावून त्या अधिकाऱ्याची बदली केल्याचा आरोप घाडगे यांनी आपल्या भाषणात केला. राजकरण ते सगळं होत राहील, कुणाला किती पळवायचे ते मी आता ठरवलेले आहे. कुठं - कुठं पळणार आता आभाळच फाटलेले आहे.

कुठं - कुठं शिवनांर, हे सर्व करत असताना काहीतरी नुसतं घोषणा किंवा काहीतरी बी प्रॅक्टिकल राजकीय असे मला काही करायचे नाही तर खरोखर जनतेच्या मनात मला स्थान मिळवायचे आहे. आता नुसती कारखानदारीच नाही तर बाकीच्या गोष्टी लढत असतांना आता मीच नंबर एक राहणार असल्याचे घाडगे शेवटी म्हणाले. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव बोबडे, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अंकुशराव बोबडे, महेंद्र मेठी, तीर्थपुरी नगरपंचायतचे नगरसेवक रमेश बोबडे, सचिन चिमणे, रामप्रसाद बोबडे, लक्ष्मण उढाण, बाबा उढाण यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...