आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मदतीचा हात:राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या चैतन्य योग; प्रत्येकाने योग जीवनशैली अंगीकारावी : जोशी

जालना4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

निरोगी आणि आनंददायी जीवनशैलीसाठी प्रत्येकाने नियमित योग साधना करावी, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीचे जिल्हा कार्यवाह सुनील जोशी यांनी केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती जालना व चैतन्य योग केंद्राच्यावतीने देविगरी पतसंस्थेच्या हॉलमध्ये आयोजित सात दिवसीय योग परिचय शिबिराचे उदघाटन मंगळवारी जोशी यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वल करून झाले. त्यावेळी अध्यस्थानावरून ते बोलत होते. व्यासपीठावर अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. भूषण भाले, चैतन्य योग केंद्राचे अनंत दापके, गोपाळ कुलकर्णी, मनिष कवडी यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी शिबिरार्थींना मार्गदर्शन करताना जोशी म्हणाले, की आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. मात्र, कोरोना काळात चांगल्या आरोग्याचे महत्त्व प्रत्येकालाच कळाले असून, अनेकजण योग साधनेसह व्यायामाकडे वळत आहेत. चैतन्य योग केंद्राच्या माध्यमातून गत काही वर्षांपासून योगाच्या प्रचार, प्रसारासह उत्तम योग शिक्षक घडविण्याचे होत असलेले काम कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले. अस्थिरोग डॉ. भाले यांनीही यावेळी योग व व्यायामाचे फायदे सांगून आपले अनुभव सांगितले. शिबिरात महिला, पुरुषांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. शिबिरासाठी चैतन्य योग केंद्राचे गोपाळ कुलकर्णी, शरद खोत, शाम जोशी आदींनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक व सूत्रसंचलन मनिष कवडी यांनी केले.

शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन : आजच्या धावपतळीच्या युगात प्रत्येकजण स्वत:च्या आरोग्यासाठी योग साधना व व्यायामाला महत्त्व देत आहे. योगाबाबत अधिक जाऊन घेण्यास उत्सुक आहे. योग म्हणजे काय, आसने प्राणायम कसे करतात यांची शास्त्रशुध्द माहिती साधकांना मिळावी या हेतून चैतन्य योग केंद्राच्यावतीने हे येत्या ११ एप्रिलपर्यंत हे मोफत योग शिबीर घेण्यात येत आहे. या शिबिरात आसन, प्राणायम, शुध्दिक्रिया याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येत आहे. तरी अधिकाधिक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन चैतन्य योग केंद्र जालना यांच्यावतीने करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...