आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, कुलाबा (मुंबई) यांनी दिलेल्या सूचनेनुसार जालना जिल्ह्यात येत्या १५ व १६ मार्च या कालावधीत तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस तर ताशी ३०-४० कि.मी. प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. या नैसर्गिक आपत्तीसंदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घेण्याची सूचना निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांनी केले आहे. यात मेघगर्जनेवेळी वीजा चमकत असताना किंवा वादळी वारे वाहत असताना झाडाखाली किंवा झाडाजवळ उभे राहु नये.
विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. गडगडाटीच्या वादळादरम्यान व वीजा चमकताना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये, वीजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल / सायकलपासून दूर रहावे. मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजाचे खांब, विद्युत दिव्यांचे खांब, धातूचे कुंपन, विद्युतवाहिनी अथवा ट्रॉन्सफॉर्मजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्या अधांतरी लटकणाऱ्या / लोंबकळणाऱ्या तारांपासून दूर रहावे. वीजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व डोके दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये झाकावे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.