आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन गटातील वाद प्रकरण:जालन्यातील चांदई एक्को गावात एसआरपीएफची तुकडी तैनात, 302 जणांवर गुन्हे, 32 जण ताब्यात

जालना6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील चांदई एक्को या गावात प्रवेशव्दार कमानीला नाव देण्यावरुन दोन गटात गुरुवारी (ता. 12) वाद झाला.पोलिसांनी या प्रकरणी 302 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून आज धरपकड करत पोलिसांनी 32 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

भोकरदन तालुक्यातील चांदई एक्को या गावच्या प्रवेशव्दारावरील वेशीच्या नाव देण्याच्या कारणावरुन महिनाभरापासून गावात वाद सुरु होता. दरम्यान, वेशीच्या बाजूला एका महापुरुषाचा पुतळा काढल्यामुळे वाद वाढला होता. दरम्यान काल मोठ्या प्रमाणात जमाव होऊन दगडफेक होऊ लागल्यामुळे पोलिसांना गोळीबार करावा लागला होता. या गोळीबारात एकजण जखमी झाला आहे. आता गावात शांततेचे वातावरण आहे

32 जण ताब्यात, एसआरपीएफची तुकडी तैनात

दरम्यान, शुक्रवारी पोलिसांनी 32 जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच एक एसआरपीएफची एक तुकडी तैनात केली आहे.गावात पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांच्यासह विविध जिल्ह्यातील पोलीस घटनापस्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान, पोलुसांनी संपूर्ण गावालाच वेढा मारुन दगडफेक करणाऱ्यांना ताब्यात घेतले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...