आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील विविध भागांतून दुचाकींची चोरी करून त्यांची विक्री करणाऱ्या अट्टल दोन गुन्हेगारांना चंदनझिरा पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे. त्यांच्याकडून दुचाकी जप्त करण्यात आली आहे. एमआयडीसी परिसरातून चक्रेश्वर टेकाळे यांनी ७ मार्च रोजी चंदनझिरा पोलिस ठाण्यात दुचाकी चोरीची तक्रार दिली होती. या गुन्ह्याचा तपास करीत असताना सदरील दुचाकी विक्रीसाठी कन्हैयानगर येथे रेकॉर्डवरील गुन्हेगार येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी सापळा लावून अशोक भिकाजी तरकसे याला ताब्यात घेतले. त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने सदरील दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. आणखी विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, त्याने चंदनझिरा हद्दीत जबरी चोरी व सदर बाजार हद्दीत दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक रघुनाथ नाचण, पोलिस उपनिरीक्षक झलवार, पोउपनि शिंदे, संजय गवई, नंदू ठाकूर, साई पवार, रवी देशमुख, राजू पवार, राहुल काकरवाल यांनी केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून जिल्हाभरात दुचाकी चोरीला जाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.