आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस प्रशासन:चंदनझिरा पोलिसांचे सोमवारी वसाहतीत पथसंचलन; सणोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची सतर्कता

चंदनझिरा17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रमजान ईद सण आणि अक्षय तृतीयेचा सण साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था व शांतता राखण्यासाठी समाजकंटकांवर कायद्याची जरब बसावी यासाठी चंदनझिरा पोलिसांनी सोमवारी वसाहतीत पथसंचलन केले.

मुस्लिम समाजाचा मोठा सण रमजान ईद मंगळवारी साजरा होणार आहे. या सणाला गालबोट लागू नये. सामाजिक सलोखा राखला जावा, शांततेने बंधुभावाने व सलोख्याने सर्व जाती धर्माचे सण उत्सव साजरे व्हावेत अशी अपेक्षा पोलिसांची आहे.

काही समाजकंटकांमुळे शहरात कुठेही कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. यासाठी प्रतिबंधात्मक म्हणून चंदनझिरा पोलिसांनी वसाहतीतील बजरंग चौक, महात्मा फुले चौक, एकता चौक, मेन रोड या मार्गावरुन पथसंचलन करण्यात आले. या पथसंचलनात चंदनझिरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नाचन यांच्यासह पोलिस सहनिरीक्षक साळवे, पोलिस उपनिरीक्षक शिवाजी पोहार, कैलास बहुरे, प्रभाकर वाघ, प्रमेश्वर हिवाळे, चंद्रभान कांबळे, चंद्रकांत माळी, अजय फोके, संजय गवई, रवि देशमुख, साई पवार ईत्यादी पोलीस कर्मचाऱ्यांचा ताफा सहभागी झाला होता.

बातम्या आणखी आहेत...