आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समस्या मिटणार:नवीन जलकुंभाला जोडतोय चंदनझिरा; लवकरच पाणी मिळण्यास होणार मदत

जालनाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील चंदनझिरा भागासाठी अंतर्गत जलवाहीनीअंतर्गत एक नवीन जलकुंभ तयार करण्यात आला आहे. या जलकुंभातून पाणी चंदनझिरा भागात घेण्यासाठी जेसीबीव्दारे काम सुरु करण्यात आले आहे. या कामामुळे या परिसरात पाणी लवकर मिळण्यासाठी मदत होणार आहे.

जालना शहरातील विविध वॉर्डांमध्ये उशिराने पाणी पुरवठा होत असल्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत होता. दरम्यान, चंदनझीरा भागातही उशिराने पाणी पुरवठा होत आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या पुढाकारातून नुकतेच जलआक्रोश आंदोलन झाले आहे. या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी संदीपान सानप, मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध भागांत तयार झालेल्या जलकुंभातून वॉर्डांत पाणी येण्यासाठी पालिका प्रशासनाने हालचाली सुरु केल्या आहेत.

चंदनझिरा भागातही जलकुंभ ते वॉर्डात पाणी घेण्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. याप्रसंगी माजी नगरसेवक सतीष जाधव, लहाने, डॉ. गजानन मगर, अशोक पारे, दिनेश आवटे, घुमरे, बापुराव घायाळ, बापुराव घायाळ, शेरु पठाण, अक्षय रत्नपारखे, संतोष भालेराव, भुसारे आदींची उपस्थिती होती. चंदनझीरा भागातील जलकुंभाशी जोडणी झाल्यानंतर चंदनझीरा, सिध्दार्थ नगर, बजाज नगर, आयटी परिसर, एसटी वर्कशॉप परिसर, रामतीर्थ बायपास परिसर, सुंदरनगर, बारवाले कॉले परिसरासह आदी भागाला याचा फायदा होणार आहे.

चंदनझिरा परिसरात मजुरांची संख्या मोठया प्रमाणात चंदनझिरा भागात मोठ्या प्रमाणात वस्त्या झाल्या आहेत. या भागांमध्ये औद्योगिक वसाहत भागात मजूरांची संख्या मोठी आहे. यामुळे या भागात नित्याने पाणी येण्याची गरज आहे. परंतू, सध्या ते संपूर्ण शहरातच अस्तित्वात नाही. परंतू, जलकुंभांशी वॉर्डची जोडणी होत असल्यामुळे लवकर पाणी मिळण्यासाठी मदत होणार आहे.

काम करून घेण्यासाठी पुढाकार वॉर्डातील प्रलंबीत कामे करुन घेण्यासाठी वारंवार पाठपुरावा केला आहे. आता अंतर्गत जलवाहीनीतंर्गत असलेल्या नवीन जलकुंभातून पाणी पुरवठा होणार असल्यामुळे उिशराने होणारा पाणी पुरवठा लवकर होण्यास मदत होणार आहे. येणाऱ्या काळात उिशराने पाणी येणारी सायकलींग अजून कमी होणार असल्याचे माजी नगरसेविका स्वाती सतीष जाधव यांनी सांगितले.