आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यक्रमाचे आयोजन:देहेड येथे चंडिका माता नवरात्रोत्सवास प्रारंभ

देहेड8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील देहेड येथील चंडिका मातेच्या नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला असून यंदा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दर्शनासाठी दूरवरुन भाविक येतात. आदिमाता चंडिकेचे येथे पुरातन ठिकाण असल्याचे जुन जाणकार सांगतात. यात्रेत विविध प्रकारच्या दुकाना थाटल्या आहेत.

मागील दोन वर्षापासून काेरोनामुळे यात्रा भरली नव्हती. यंदा सर्व नियम शिथिल केल्याने भाविकांमध्ये उत्साह आहे.मंदीरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. भाविकांची गैरसोय होणार नाही याची खबरदारी देवीसंस्थान आणि ग्रामपंचायतने घेतली आहे.