आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रासेयो शिबिर:बदलाची सुरुवात स्वत:पासूनच करावी

घनसावंगी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्वामी रामानंद शिक्षण संस्थेचे सचिव विनायक चोथे यांचे आवाहन

विद्यार्थी वर्ग हा राष्ट्रीय संपत्ती असून पुस्तकी ज्ञाना बरोबरच युवकांमध्ये आपण समाजाचे, देशाचे देणं लागतो या भावनेतून समाजोपयोगी कार्यात सहभाग नोंदवला पाहिजे. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी प्रचंड मेहनत घेण्याची तयारी असायला पाहिजे तसेच जे बदल आपल्याला आपल्या समाजात, देशात झाले पाहिजे असे वाटत असेल त्याची सुरुवात स्वतःपासून करावी, असे आवाहन स्वामी रामानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव विनायक चोथे यांनी केले.

घनसावंगी येथील संत रामदास महाविद्यालय व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमानाने रामगव्हाण येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबीराचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. प्रमोद जायभाये, कार्यक्रमाधिकारी गंडे, घोंगे, उपसरपंच विष्णूकांत शिंदे, मुख्याध्यापक लक्ष्मण वादे, नितीन सोळंके, लक्ष्मण दिवटे, शिवाजी सोळंके, राजेंद्र धांडे आदींची उपस्थिती होती. सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रीय सेवा योजना माध्यम आहे, राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरांमधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा विकास होतो. ते स्वावलंबी होतात. ग्रामीण जीवन कसे असते हे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवायला मिळते. ग्रामीण भागातील समस्या कळतात. सामाजिक भावना जागृत होतात. आपण समाजासाठी काही तरी करावे अशी भावना विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण होते. स्वतःवरील विश्वास बळावतो असेही चोथे म्हणाले. यावेळी प्राध्यापक, ग्रामस्थ , रासेयो स्वयंसेवक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...