आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारेणुकाई रब्बीतील हरभरा व गव्हाचे पिक ऐन फुलोरा अवस्थेत असताना मागील तीन दिवसापासून अचानक वातावरणात गारवा व ढगाळ वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे हे वातावरण रब्बीतील गहु व हरभरा पिकासाठी नुकसानकारक आहे. आधीच खरीपात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी रब्बीत उसनवारी करुन पेरणी केली. माञ त्यात देखील निसर्गाची अवकृपा शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नसल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. यंदा पाऊसमान चांगले झाले.त्याचा परिणाम म्हणून सर्वञ जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली.याचा उपयोग शेतकऱ्यांनी रब्बी पेरणीसाठी केला.तालुक्यात जवळजवळ पन्नास हजार हेक्टरच्या वर शेतकऱ्यांनी गहु, हरभरा, मका, ज्वारी, मोहरी, सुर्यफुल आदी पिकाची पेरणी केली. मध्यतरी अवकाळी पावसाने हजेरी लावुन गहु व हरभरा पिकाचे नुकसान झाले होते. त्यातुन सावरत शेतकऱ्यांनी महागडी औषधी फवारणी करुन पिके हातात आणली. आता हरभरा व गव्हाचे पिके ऐन फुलोरा अवस्थेत आहे.
अशातच मागील तीन दिवसापासून वातावरणात बदल झाला आहे. हा बदल रब्बीतील पिकाच्या मुळावर उठला असल्याचे शेतकरी सांगत आहे. ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्याचे फुल गळुन पडत आहे. त्यामुळे हरभरा पिकातुन अपेक्षित उत्पादन हाती न लागण्याची भिती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. शिवाय गव्हाला देखील ओंब्या लागला आहे. माञ त्यावर देखील आता तांबेरा आणि मावा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. सदर रोग आटोक्यात आणण्यासाठी शेतकऱ्यांना आता पुन्हा महागडी औषधी फवारणी करावी लागणार आहे. औषधी फवारणीसाठी देखील पैसे नसल्याचे वास्तव आहे. शासनाने देखील अद्याप दुष्काळ अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केलेले नाही.
आणखी किती दिवस लागले हा संशोधनाचाच विषय आहे. पिके ऐन जोमात असताना झालेल्या नैसर्गिक बदलामुळे रब्बीत देखील शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. खरीपाने धोका दिला. त्यामुळे शेतकऱ्यांची संपूर्ण भिस्त रब्बीवर होती. माञ त्यात देखील वातावरणाचे अधुनमधुन होणाऱ्या बदलामुळे रब्बीतील हात धुवून बसण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे चिञ आहे. यासाठी कृषी खात्याने शेतकऱ्यांना बांधावर जात दिलासा देणे गरजेचे आहे. दरम्यान, मागील तीन दिवसापासून अचानक वातावरणात बदल झाला आहे. मी सहा एकर हरभरा व तीन एकर गहु पेरलेला आहे. माञ खराब वातावरणामूळे हरभरा पिकाची फुलगळ होऊ लागली आहे. गव्हाला देखील फटका बसला आहे. त्यामुळे उत्पादनात निश्चितच घट होणार आहे.
निसर्गाची अवकृपा शेतकऱ्याची पाठ सोडायला तयार नसल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या हतबल झाले आहेत. शासनाने शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी शेतकरी रामेश्वर देशमुख यांनी केली. वातावरण बदलाचा काही प्रमाणात रब्बीतील गहु व हरभरा पिकाला फटका बसणार आहे. माञ शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. कृषी विभागाच्या सल्ला घेऊन शेतकऱ्यांनी पिकावर फवारणी काढावी. गतवर्षी देखील याही पेक्षा अधीक खराब वातावरण होते. कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत असल्याचे तालुका कृषी अधिकारी रामेश्वर भुते यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.