आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मूलमंत्र:मूलमंत्र जपा जीवनात तुम्हाला फायदाच होईल : गुरुप्रीतसिंग

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुची सेवा ही केलीच पाहिजे. त्याशिवाय आपल्या जीवनात उत्तम फळ मिळणार नाही. उत्तम फळाची जेव्हा आपण अपेक्षा करतो, तेव्हा त्याचे नियम देखील पाळले पाहिजेत, असा हितोपदेश भाईसाहेब गुरुप्रीत सिंग यांनी येथे बोलतांना दिला.

दुर्गामाता रोडवर असलेल्या एसएसडी गार्डनच्या विस्तर्ण पंटगणावर ते बोलत होते. ए मन जैसा सेवाही तैसा हो वही ते हे करत कमाई । आपि बीजि आपे ही खावणा कहणा किछू न जाइ ॥ महा पुरखा का बोलणा होवै कितै परथाइ । ओइ अंम्रित भरे भरपूर हहि ओना तिलु न तमाइ ॥ या पंक्तीवर निरुपन करतांना ते म्हणाले की, गुरुंची सेवा करणे हा आपला परम् धर्म आहे. त्याशिवाय कोणतंही फळ मिळत नाही, आणि त्याची अपेक्षाही करु नये. सकारात्म विचार ठेवा, तुमचे काम शंभर टक्के झाल्याशिवाय राहणार नाही. जसे विचार तसेच फळ मिळते, असे सांगून ते म्हणाले की, मनुष्याची भावना कशी असते यावर बरेच काही अवलंबून आहे. आपण जसे विचार ठेवतो, तसेच झाल्याशिवाय राहात नाही. राजा गेल्या पंधरा वर्षापासून विहाराला जात असे. त्याला दररोज एक बंगला दिसायचा.एक दिवशी मात्र त्याने हा बंगला पाडण्याचा आदेश आपल्या मंत्र्यांना दिला.

मंत्र्याना वाटलं आज राजाला काय झालं? त्याने हा बंगला पाडून टाकायला सांगितलं. मंत्री मनोमन विचार करु लागला. तीन- चार दिवस उलटून गेले तरी बंगला काही पडला नाही. राजाने पुन्हा मंत्र्यांना विचारलं हा बंगला अजून जशाच तसाच उभा आहे. त्याने पुन्हा मंत्र्यांना विचारलं, तेव्हा मंत्र्यांनी हा बंगला आज पडेल, असे सांगितले तेव्हा मात्र राजाने मंत्र्यांना हा बंगला पाडू नका, असे फर्मान सोडले. शेवटी काय तर जे मनुष्याच्या मनात जे आहे, तेच होते, असेही भाईसाहेब गुरुप्रीत सिंग म्हणाले. यावेळी सिंधी पंचायत, पंजाबी समाजातील भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...