आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामसडक योजना:मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करणार रस्त्याचे काम : खोतकर

टेंभुर्णीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जालना तालुक्यातील पानशेंद्रा येथील गावातील प्रमुख कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे उपनेते तथा माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांची भाग्यनगर येथील दर्शना बंगल्यावर भेट घेतली. यावेळी माळाचा गणपती ते पानशेंद्रा डोंरवस्ती ते देऊळगाव राजा रोड हा नवीन रस्त्याचे काम करावे, अशी मागणी केली. या मागणील उत्तर देत रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करण्यात येईल, अशी ग्वाही खोतकर यांनी दिली.

जालना -सिंदखेड राजा राज्यमार्ग व जालना- दे.राजा राष्ट्रीय मार्ग हे जालना शहराच्या बाहेर जोडण्याचे काम या रस्त्यामुळे होणार आहे. परिणामी दोन्ही मार्गाने रहदारी करणाऱ्यांना जालना शहरात यायची आवश्यकता देखील राहणार नाही. त्यामुळे शहरातील वाहतुकीची कोंडीसुध्दा निर्माण होणार नाही, यामुळे हा रस्ता होणे अत्यंत गरजेचे आहे. हे काम तातडीने हाती घेण्यात यावे, अशी प्रमुख मागणी ग्रामस्थांनी यावेळी केली.

या रस्त्याच्या समस्येबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत समस्या मांडून या नवीन रस्त्याच्या कामाचा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत समावेश करण्यात येऊन यासाठी निधी तसेच मंजूरी घेतली जाईल, असे सांगितले.यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख पंडितराव भुतेकर, दलित आघाडी प्रमुख अॅड. भास्कर मगरे यांच्यासह पानशेंद्रा येथील सरपंच बाळासाहेब पाचरणे, व्हाईस चेअरमन विठ्ठलराव पाचरणे, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...