आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आश्वासन:शहरातील मूर्तीवेस रस्ता सुरू करण्याचे मुख्याधिकाऱ्यांचे आश्वासन; आंदाेलन मागे

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना शहरातील मूर्तीवेस जीर्ण झाल्याने पडण्यास आल्यामुळे अनेक महिन्यांपासून हा मार्ग बंद केलेला आहे. हा रस्ता सुरळीत करण्यात यावा या मागणीसाठी ६ ऑक्टोबर रोजी आंदोलन करण्याचा इशारा नागरिक व व्यापाऱ्यांनी दिला होता. या अनुषंगाने व्यापारी व नागरिक या ठिकाणी आले होते. या वेळी मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी रस्ता एका बाजूने सुरू करायचा की दोन्ही बाजुने सूरू करायचा याबाबत मीटिंग घेऊन १० ऑक्टोबर रोजी माहिती देतो, असे आश्वासन दिले. यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

वेशीच्या दोन्ही बाजूंनी रस्ता सुरू करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. बंद वेशीमुळे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, मुख्य बाजारपेठेत गर्दी होत आहे. रस्ता सुरू करण्यासाठी आंदोलनाचा इशारा दिला होता. आंदोलन करण्यासाठी व्यापारी, नागरिक गोळा झाले होते.

याप्रसंगी मुख्याधिकाऱ्यांनी रस्ता एका बाजूने सुरू करण्याचे आश्वासन दिले. या वेळी माजी नगरसेवक महेश दुसाणे, जयेश शहा, महेमूद कुरेशी, विष्णू वाघमारे, चंदू मिसाळ, राधेश्याम विजयसेनानी, दुर्गेश काठोठीवाले, राजू वाघरूकर, रांजणीकर आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...