आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सप्ताह:चैतन्य केंद्रातर्फे बाल आरोग्य सप्ताह

जालना18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाल दिनाचे औचित्य साधून येथील चैतन्य योग केंद्रातर्फे बाल आरोग्य सप्ताह साजरा करण्यात आला. बाल सुधार गृहात प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. एम. मोहिते यांच्या हस्ते योग शिबीराचे उद्दघाटन करण्यात आले.

या वेळी उद्योजक गोपाल घनश्याम गोयल, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. राम गव्हाणे, ॲड. महेश धन्नावत, बालन्याय मंडळ सदस्य ॲड. अश्विनी धन्नावत, बालसुधारगृहाचे अधीक्षक अमोल राठोड, योगशिक्षक ॲड. बॉबी अग्रवाल, ॲड.अक्षय धोंगडे, मनीष कवडे, दापके आदींची उपस्थिती होती. न्या. मोहीते यांनी उपक्रमाचे कौतुक करत बालकांना मायेची थाप दिली. त्यांच्या हस्ते खाऊचे वाटप करण्यात आले. योगशिक्षक ॲड. बॉबी अग्रवाल, व ॲड. अक्षय धोंगडे बालकांना योगासनांची प्रात्यक्षिके सादर करून योगाचे धडे देत आहेत.

बातम्या आणखी आहेत...