आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण:जास्तीत जास्त पालकांनी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी ही मोहीम यशस्वी होण्यासाठी सहकार्य करावे, आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे आवाहन

जालनाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

देशात 3 जानेवारी म्हणजेच आजपासून 15 ते 18 वर्षांच्या मुलांना कोरोना व्हॅक्सीन देण्यास सुरुवात झाली आहे. लसीकणासाठी CoWIN अॅपवर रविवारपर्यंत 7 लाखांपेक्षा जास्त रजिस्ट्रेशन झाले. दरम्यान महाराष्ट्रातही लसीकरणास सुरुवात झाली आहे. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालन्यातील रुग्णालयात उपस्थित राहून 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ केला. यावेळी त्यांनी जास्तीत जास्त मुलांनी ही लस घ्यावी असे आवाहन देखील केले आहे.

लसीकरण केंद्रांवर बोलताना राजेश टोपे म्हणाले की, 'कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा नेटाने सामना करायचा असेल तर लसीकरण हेच अस्त्र आहे. माझ्यासमोर काही मुलांचे लसीकरण करण्यात आले. यावेळी ही मुले खूप उत्साही दिसत होती. 15 ते 18 या वयातील मुले ही जास्त फिरत असतात. या मोहिमेला यशस्वी करण्यासाठी जास्तीत जास्त पालकांनी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी सहकार्य करावे.' असे आवाहन देखील राजेश टोपेंनी केले आहे.

मुलांच्या लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन प्रोग्राम शनिवारीपासून झाला होता. सरकारकडून जारी निर्देशनुसार, कोविन अॅपवर पहिलेच बनलेल्या अकाउंट किंवा नवीन अकाउंट बनवून रजिस्ट्रेशन केले जाऊ शकत होते. या व्यतिरिक्त व्हॅक्सीनेशन सेंटरवर जाऊनही रजिस्ट्रेशन केले जाऊ शकत होते. रविवारी रात्रीपर्यंत 15 ते 18 वर्षांच्या 7.90 लाख मुलांनी लसीसाठी रजिस्ट्रेशन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...