आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेश फेस्टिव्हल:भोकरदनच्या गणेश फेस्टिव्हलमध्ये बालकलाकरांची स्टेजवर धमाल

फत्तेपूर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन येथे श्री गणेश उत्सव निमित्त गणेश महासंघाच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यातील चिमुकल्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या नृत्यविष्कार चांगलाच रंगला.

या कार्यक्रमासाठी निर्मला रावसाहेब दानवे, माजी नगरध्यक्षा मंजूषा देशमुख, माजी नगरध्यक्षा अर्चना चिने यांची प्रमुख उपस्थिती होती. नृत्य स्पर्धेत मोठ्या संख्येने लहान मुलांनी सहभाग घेवून विविध गाण्यावरती नृत्यसादर केले. तसेच स्वरदीप ऑरकेस्ट्राचे संचालक दीपक कुमार गायकवाड यांच्या संचाने हिंदी, मराठी गाण्याने प्रेक्षकांपुढे सादरीकरण केले. तर जूनियर शाहरुख ने फिल्मी डायलॉग सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली.

या वेळी श्री. गणेश महासंघाचे अध्यक्ष मुकेश चिने, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ देशमुख, महादुसिंह राजपूत, मोहन हिवरकर, मराठी पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष फकीरा देशमुख, माजी नगरसेवक चंद्रकांत पगारे, शेख नजीर, नारायण जीवरग, रमेश बिरसोने माजी नगरध्यक्षा अर्चना चिने, माजी नगरध्यक्ष रेखा पगारे, माजी नगरध्यक्ष आशा माळी, शोभाबाई मतकर यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिति होती. दरम्यान, भोकरदनकरांसाठी होत असलेल्या कार्यक्रमात नागरिकांनी येऊन आनंद घ्यावा, असे आवाहन मुकेश चिने यांच्या वतीने करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...