आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभोकरदन तालुक्यातील दानापूर येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत बुधवारी बालआंनद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी या मेळाव्यात ५० स्टाॅल लावून स्वत: बनविलेल्या विविध साहित्याची विक्री करुन १० हजार रुपयांची उलाढाल केली. तसेच बाजारात अनेक प्रकारे वेगवेगळ्या जाहीरातीचे फलक लावुन पालक व ग्राहकांना आकर्षित केले. होते. सरपंच शकीला बी शेख मोबिन, आसरा एजुकेशन सोसायटीचे अध्यक्ष शेख जफर यांच्याहस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी ग्रामसेवक एस. डी. बावस्कर, शालेय समितीचे अध्यक्ष शेख जुबेर, प्रा. शेख अमर आदीची उपस्थिती होती.
यावेळी पालकांनीही विविध पदार्थाची खरेदी करुन विद्यार्थ्यांनी स्वपरिश्रमाने बनविलेल्या पदार्थाचा आनंद घेतला. तर विद्यार्थ्यांनी देखील आपण बनवलेल्या पदार्थाचा खप कसा जास्त होईल व त्यातुन दोन पैसे आपल्याला कसे मिळतील या पद्धतीने योग्य नियोजन करुन ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. बाजारात पाचवी ते आठवीच्या ७० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून प्रत्येकी गटनिहाय ५० स्टाॅल लावले हाेते.
यात मिठाई, चिवडा, पाणीपुरी, जिलेबी, दहीवडा, कचाेरी, उपवासाचे पदार्थ आदी विक्रीस ठेवले होते. या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक, शिक्षकांनी मार्गदर्शन केले. या बालआनंद मेळाव्यात आर. वाय. कुरेशी, जावेद, हकीम कुरेशी, मोबिन शेख, यासिन शाह, शेख अजीम, राईस शेख, जुबेर पटेल, सलीम शेख, साजिद चोधरी, अजीम चोधरी, अजहर शेख, जुनेद शेख, अलीम शेख, बशीर शाह यांच्यासह पालक, विद्यार्थी आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.