आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना आपल्या शालेय जीवनात आपल्यामध्ये असलेल्या सुप्त कलागुणांचे प्रदर्शन करण्याची संधी मिळावी व चिमुकल्यांना आनंद घेता यावा यासाठी परतूर तालुक्यातील कोकाटे हदगाव केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळी धामणगाव शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित स्नेहसंमेलनातील सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे प्रदर्शन करुन प्रेक्षकांची मने जिंकली.
अध्यक्षस्थानी आष्टी बीटचे विस्तार अधिकारी प्रकाश ढवळे तर प्रमुख अतिथी म्हणून कोकाटे हदगाव केंद्राचे केंद्रप्रमुख प्रल्हाद रायमुळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विनोद वाहुळे, सरपंच लता शिर्के, उपसरपंच सुनिता पवार, उपाध्यक्ष अशोक शिंदे, पोलिस पाटील मधुकर वाहुळे, ग्रामपंचायतचे सदस्य, शाळा व्यस्थापन समितीचे सदस्य आदींची उपस्थिती होती.
प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मोरया मोरया या गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. अभिरूप न्यायालय, तेरी मिट्टी में मिल जावा या देशभक्ती गीताने वातावरण भारावून गेले. आईचा गोंधळ हे पारंपारिक नृत्य, लोक नृत्य, शेतकरी गीताला उपस्थितांनी प्रतिसाद दिला. दोनच राजे इथे गाजले, माऊली माऊली या क्लासिक नृत्याने सर्व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. प्रेक्षकांची दाद मिळवत बक्षिसांच्या स्वरूपात २७ हजार ५०० रूपयांची देणगी शाळेला प्राप्त झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सलावद्दीन देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन निहाल शेख यांनी तर जि. एन. काटकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक किरण नवरंगे, सांस्कृतिक विभागाचे प्रमुख आशिष हलाले, गणेश जाधव, एस. डी. शहारे आदींनी परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.