आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ख्रिसमस साजरा‎:समाजातील अनाथांसाेबत‎ केला ख्रिसमस साजरा‎

जालना‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गॉडस जीजस लॅम्ब क्राईस्ट चर्चच्या वतीने‎ दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ख्रिसमस निमित्त‎ मागील आठ वर्षापासून गरीब व अनाथांना‎ साडी वाटप करून ख्रिसमस साजरा‎ करण्यात आला.‎ अध्यक्षस्थानी रेव्ह. जगन्नाथ गौडा तर‎ प्रमुख पाहुणे म्हणून स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. शोभा‎ मोजेस, जालना कारागृह प्रमुख साहेबराव‎ आडे, धर्मादाय आयुक्त अजितसिंग‎ पाटील, संजय सोनवणे, कैलास भालेराव,‎ रोहित,अनुराग पाटोळे, रॉकी कसबे,‎ चांगदेव भाकरे, रेव्ह विल्सन वानखेडे यांची‎ उपस्थिती होती.

जगन्नाथ गौडा म्हणाले,‎ ज्या प्रमाणे येशु ख्रिस्त यांनी आपले जीवन‎ गोरगरीबांसाठी दिले त्याच प्रमाणे आपल्या‎ पदरातून गोरगरीब लोकांसाठी आपण दिले‎ पाहिजे. सूत्रसंचालन कैलास भालेराव यांनी‎ तर चांगदेव भाकरे यांनी आभार मानले.‎ यावेळी समाजबांधव मोठया संख्येने‎ उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...