आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटी प्रवासाच्या २४ प्रकारच्या योजना:अमृत योजनेचा लाभ घेणाऱ्या नागरिकांचे जाफराबाद बसस्थानकात केले स्वागत

जाफराबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेत ७५ वर्षे पूर्ण करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेंतर्गत मोफत प्रवास करता येणार आहे. या अनुषंगाने जाफराबाद बसस्थानकात ज्येष्ठ नागरिकांना पेढे वाटून मोफत प्रवासाचा लाभ देण्यात आला.यावेळी वाहक संध्या मुंढे, चालक एम. एल. बनकर यांनी स्वागत केले.ज्या नागरिकांचे वय ७५ वर्षाच्या वर आहे, अशा जेष्ठ नागरिकांनी एसटीचा प्रवास करताना सोबत आधार कार्ड अथवा निवडणूक ओळखपत्र किंवा राज्यशासनातर्फे निर्गमित केलेले ओळखपत्र यापैकी कोणतेही एक ओळखपत्र सोबत ठेवणे बंधनकारक असुन ते ओळखपत्र वाहकाला दाखवुन आपला मोफत प्रवास सुलभ करावा, यासाठी हे जेष्ठ नागरिक महाराष्ट्रभर कुठेही व एसटी महामंडळाच्या कोणत्याही बसमध्ये प्रवास करू शकतात. ही योजना फक्त महाराष्ट्र राज्यापुरतीच हद्दीत आहे, असे वाहतूक निरीक्षक शरद पंडीत यांनी सांगितले. एसटी प्रवासाच्या २४ प्रकारच्या योजना आहेत.

यात ६५ वर्षे वयापेक्षा अधिक वयधारकांना जेष्ठ नागरिक योजना,विद्यार्थींनींना शिक्षणासाठी मोफत बस ,विद्यार्थ्यांना सवलतीत पास, अपंग, मूक बधिर, दलितमित्र डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्राप्त, पत्रकार, द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त व्यक्तींना सवलतीच्या दरात तसेच दुर्दर आजार,कर्करोग रुग्णांना उपचारार्थ प्रवासासाठी एसटी भाड्याची मुभा असून यासह विविध योजना आहेत. या दोन दिवसांत जाफराबाद येथील आगारातून १५०० ज्येष्ठ नागरिकांनी प्रवास केला असल्याचे सांगण्यात आले. यावेळी मोतीराम देवकर, कडूबा दिवटे, सरलाबाई जवखेडा, सुमन राठे, वत्सला माळी यांच्यासह वाहतुक नियंत्रक लिंबाजी फदाट, अनिल छडीदार, भरत पंडीत, विशाल गायकवाड, प्रवीण पिंपळे, अमोल कोलते यांच्यासह एसटीचे कर्मचारी, प्रवाशी आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...