आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योजना:प्रधानमंत्री आवास योजनेसाठी नागरिकांची झुंबड

तीर्थपुरी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील नगरपंचायतअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेतील सर्वेक्षणाच्या अर्ज नोंदणीसाठी ३० ऑगस्टची अंतिम मुदत दिली असल्याने अर्ज नोंदणीसाठी नगरपंचायत कार्यालयासमोर नागरिकांची एकच गर्दी उसळत आहे. नोंदणी अर्ज वाटप व घेण्यासाठी नगरपंचायतच्या वतीने मंडप टाकून स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. अर्जासाठी महिलांसह पुरुषांच्या रांगा लागल्या आहेत. रांगा लावूनही रेटारेटी होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

सर्वेक्षणाची ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी नगरपंचायतने अस्मि ग्रुप एजन्सीची नेमणूक केली आहे. गुरुवारी ३०० व शुक्रवारी १ हजार असे दोन दिवसांत १३०० अर्जाची विक्री झाली असल्याची माहिती संबंधितांनी दिली. दरम्यान, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तीर्थपुरी शहरातील कच्चे, अर्धे पक्के घरमालकांकरिता तसेच झोपडपट्टी धारक किंवा स्वतःचे घर नसणाऱ्या कुटुंबाकरिता तसेच सन २००० पूर्वीपासून राहणारे कुटुंब ज्यांचे उत्पन्न ३ लाखाच्या आत आहे, अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना याचा लाभ घेता येईल.

तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांकरिता ३२३ चौरस फूट व अल्प उत्पन्न घटकांकरिता ६६४ चौरस फूट चटई क्षेत्रफळापर्यंत जागा नावावर असायला पाहिजे, यात राज्यशासनाचे १ लक्ष व केंद्र शासनाचे १.५ लक्ष असे दोन्ही मिळून अडीच लक्ष रुपये अनुदानाची रक्कम मिळणार आहे. दरम्यान, तीर्थपुरीत अनेक जणांकडे जागा आहेत, परंतु त्या काहींच्या आजोबा, पणजोबा यांच्या नावावर असून वारसाहक्काने नावावर करून न घेतल्याने त्यांना तांत्रिक अडचणी येऊ शकतात.

बातम्या आणखी आहेत...