आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाचवले प्राण:पाण्याच्या शोधात विहिरीमध्ये पडलेल्या काळविटाचे नागरिकांनी वाचवले प्राण!

पिंपळगाव रेणुकाई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उन्हाच्या काहिलीने व्याकूळ झालेल्या हरणांच्या कळपातील काळवीट पाण्यात पडल्याची घटना उमरखेडा येथे शनिवारी घडली. हा प्रकार लक्षात येताच नागरिकांनी विहिरीत पडलेल्या काळविटाला दोरीच्या साहाय्याने बाहेर काढून जीवदान दिले.

उमरखेडा या गावात पाण्याच्या शोधात असलेले काळवीट विहिरीत पडल्याचे शेतकरी गजानन फुके यांच्या लक्षात येताच त्यांनी सरपंच राजू होलगे यांना माहिती दिली. सरपंचांनी कोणताही विलंब न लावता आपल्या ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांना बरोबर घेत विहीर गाठली. या वेळी नितीन पवार, बद्रीनाथ फुके यांनी घटनास्थळ गाठून विहिरीतून काळवीट बाहेर काढण्याचे नियोजन केले.

या वेळी तिघांनी पाण्यात उतरून काळविटास दोरीने बांधले. विहिरीवर उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्याला विहिरीबाहेर सोडून दिले. ग्रामस्थांकडून बद्रीनाथ फुके यांचे कौतुक होत आहे. या वेळी राजेंद्र पंडित, दीपक होलगे, रामेश्वर फुके, धनराज पंडित, ऋषी होलगे, हरिदास फुके, अशोक होलगे, नाना पवार, सोमनाथ फुके, अनिरुद्ध होलगे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...