आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस:दावे-प्रतिदावे भोकरदन तालुक्यात 24 ग्रामपंचायती भाजपकडे, तर 7 राष्ट्रवादी काँग्रेसकडे

भोकरदन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

घनसावंगी भोकरदन तालुक्यात ३२ ग्रामपंचायतीच्या झालेल्या निवडणुकीत २४ ग्रामपंचायती भाजपकडे तर ७ ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेसकडे व एक ग्रामपंचायत अपक्षकडे गेल्याचे मतमोजणी झाल्यानंतर लागलेल्या निकालावरून स्पष्ट झाले. चार ग्रामपंचायतचे सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत त्यातील दोन ग्रामपंचायतीचे सरपंचासह सदस्य ही बिनविरोध निवडून आले , उर्वरित ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि सदस्यांसाठी ही निवडणूक झाली.

वरुड बुद्रुक ग्रामपंचायत निवडणुकीत यशोदा रामकृष्ण वाघ व कलाबाई भगवान वाघ या दोन उमेदवारांना समान मते पडल्याने त्यांची चिट्ठी काढून निवड करण्यात आली पाच वर्षाची मुलगी प्रज्ञा प्रमोद कांबळे हिच्या हाताने सर्वा समक्ष काढलेल्या चिठ्ठी मध्ये यशोदा रामकृष्ण वाघ यांच्या नावाची चिठ्ठी निघाल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले. भोकरदन तालुक्यात प्रतिष्ठेच्या असलेल्या व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या जवखेडा खुर्द गावच्या ग्रामपंचायत सरपंचपदाच्या निवडणुकीत त्यांच्या भावजई भाजपच्या उमेदवार सुमनबाई मधुकरराव दानवे यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनिता संतोष दानवे यांचा २६३ मतांनी पराभव करून विजय मिळविला.

आतापर्यंत सतत बिनविरोध निवडणुका होत असलेल्या जवखेडा खुर्द ग्रामपंचायतची तीस वर्षानंतर ही निवडणूक झाली हे विशेष, यावेळी चार सदस्य बिनविरोध निवडून आले तर तीन सदस्य व सरपंच पदासाठी निवडणूक झाली होती या निवडणुकीकडे संपूर्ण भोकरदन तालुक्याचे लक्ष लागले होते. भोकरदन तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या राजूर महागणपती गावच्या ग्रामपंचायत च्या निवडणुकीत भाजपच्या प्रतिभा भाऊसाहेब भुजंग यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार शांताबाई शिवाजीराव पुंगळे यांचा ३६३ मतांनी पराभव करून विजय मिळविला भुजंग यांच्या पॅनलचे ११ सदस्य ही मोठ्या फरकाने निवडून आले या निकालाकडेही सर्वांचे लक्ष लागले होते. भोकरदन तालुक्यात झालेल्या ३२ ग्रामपंचायती पैकी या दोन प्रमुख ग्रामपंचायती आहेत. बिनविरोध निवडून आलेले सरपंच भिवपूर संजय भास्कर जाधव ,मनापुर लक्ष्मण रामा सुरडकर, गोकुळ सविता दाभाडे, खामखेडा सविता नागवे हे आहेत.

तर उर्वरित सरपंचामध्ये करजगाव स्वाती लक्कस ,वरुड बुद्रुक इंदुबाई बावस्कर, मोहळाई रेणुका नितीन पालकर , राजुर प्रतिभा भाऊसाहेब भुजंग ,सावंगी अवघडराव अरबाज बागवान ,जवखेडा खुर्द सुमनबाई मधुकरराव दानवे, जवखेडा बुद्रुक कैलास पवार, देहेड वेणूबाई भाऊराव निकाळजे, नांजा शिरसागर जनार्दन गाडेकर, गव्हाण संगमेश्वर स्वाती विशाल ढवळे ,वालसा डावरगाव अर्चना दीपक जाधव, तपोवन तांडा ज्योती जगदाळे, पिंपळगाव बारव रंजनाबाई भानुदास काळे ,पळसखेडा दाभाडी राधाबाई बाबासाहेब खरात, चोराळा कमलबाई लोखंडे ,निंबोळा दुर्गाबाई नारायण निर्मळ, वडशेद कौशल्याबाई पंढरीनाथ आगलावे, ताडकळस किशोर माणिक जाधव, शेलूद शरद रामराव बारोटे, रेलगाव कृष्णा त्रिंबक मिसाळ ,कोठारा जयनपूर दत्तू पाराजी सोनवणे ,जयदेव वाडी समाधान साहेबराव उदरभरे,कोठा कोळी अनिता दत्तू सोनवणे, पिंपरी जयश्री राजदीप अंभोरे, पद्मावती मोहराबाई अंबादास पवार,लतिफपुर शशिकला दाभाडे, एकेफळ विलास नाव्हळे यांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...