आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराताालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक मतदानादरम्यान गोकुळ येथील ग्रामपंचायत निवडणूक बूथ क्रमांक १० वर एक बाहेरून आलेले बोगस मतदान असल्याच्या वादावरून बाचाबाची होवून दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली. यामध्ये रागाच्या भरात जमावाला शांत करण्यासाठी आडवे येणाऱ्या पोलिसांवर काही जनांनी दगडफेक केली असता यामध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल इंदल खुशाल बम्हणावत यांच्या फिर्यादीवरून भोकरदन पोलीस ठाण्यात वीस जणांविरुद्ध विविध गुन्हे दाखल करण्यात आले.
संशयीत राजू शिवाजी शेळके, अमोल गंगाधर शेळके, सागर सुभाष शेळके, संजय दादा शेळके दत्ता उखडा शेळके, दिलीप सुखदेव खंडागळे, रोहित सुधाकर शेळके, गंजीधर भगवान शेळके, मधुकर काशीनाथ शेळके, कडुबा नामदेव शेळके, ज्ञानेश्वर दासु ठाकरे, प्रकाश दादाराव महाकाळ, ज्ञानेश्वर भिकाजी ठाकरे, विनोद प्रभाकर शेळके, संतोष विठ्ठल ठाकरे, राजू दादाराव महाकाळ, राजू नारायण शेळके, सुभाष कडुबा शेळके, गजानन बाळा दळवी, गजानन रामा शेळके (सर्व रा. गोकुळ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, येथील ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपद हे बिनविरोध काढण्यात आले असून सदस्यांच्या निवडीसाठी दोन पॅनलअंतर्गत समोरासमोर हे मतदान सुरू होते. चार वाजेच्यादरम्यान एक मतदार औरंगाबाद येथुन आल्याची माहिती दुसऱ्या गटातील सदस्यांना मिळाल्या नंतर हे मतदान आम्ही होऊ देणार नाही म्हणून विरोध करण्यात आला. त्यावरून शाब्दिक चकमक होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. या घटनेची माहिती भोकरदन पोलिसांना मिळताच येथील पोलिस निरिक्षक रत्नदीप जोगदंड हे आपल्या सहकारी पथकासह तत्काळ दाखल झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.