आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशालेय जीवनानंतर एकमेकांपासून दुरावलेले वर्गमित्र तब्बल ३८ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. टेंभुर्णी येथील नवभारत विद्यालयातील सन १९८५ च्या दहावीच्या बॅचचे स्नेहसंमेलन रविवारी उत्साहात पार पडले. येथील बांगड कृषी फॉर्मवर संपन्न झालेल्या या स्नेहसंमेलनात जुन्या मित्रांनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. यावेळी तीस वर्ग मित्र मैत्रिणी एकत्र आले होते. कार्यक्रमात वर्ग मित्रांचे स्नेहसंमेलनात तत्कालिन शिक्षक मधुकरराव निकम, राम देव, कडूबा गाडेकर, तारामती चव्हाण सहभागी झाले होते.
प्रारंभी माजी विद्यार्थ्यांनी आपल्या या गुरुजनांचा यथोचित गौरव केला. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी एकमेकांना आपला परिचय दिला. दिवसभर चाललेल्या या स्नेहसंमेलनात वर्ग मित्रांनी गाणी, गप्पागोष्टी आदींद्वारे जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी प्रत्येक वर्गमित्राला ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
स्नेहभोजनानंतर पाणावलेल्या डोळ्यांनी या वर्ग मित्रांनी एकमेकांचा निरोप घेतला. या स्नेहसंमेलनात सर्जेराव शिंदे, देविदास देशमुख, संजय काबरा, सुरेश देशमुख, फैसल चाऊस, संजय शेजूळ, रमेश इंगळे, सय्यद मतीनोद्दीन,अब्दुल्ला शेख, संगीता काबरा, संध्या क्षिरसागर, मंगल उबरहंडे, रंजना खाडे, सरस्वती शिंदे, दिलीप जाधव, जाफरखा पठाण, महादेव मातोंडकर, दिलीप जबडे, अरुण आमले, संतोष इंगळे आदींनी सहभाग घेतला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.