आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराग्रामस्वच्छतेचे जनक, कर्मयोगी योगी राष्ट्रसंत गाडगेबाबा स्मृतिदिनानिमित्त बौद्ध महासंघ चॅरिटेबल ट्रस्ट, आनंदनगर यांच्या वतीने शहर आणि परिसरात ग्रामस्वच्छता अभियान राबवण्यात आले.उद्घाटन माजी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी निखिल पगारे यांची उपस्थिती होती.
परिसरातील पुरुष, बाल-बालिका, ज्येष्ठ नागरिक, नगर परिषदचे कर्मचारी यांनी परिसर स्वच्छ करून राष्ट्रसंत गाडगेबाबांना अभिवादन केले. संगीताताई गोरंट्याल म्हणाल्या, जालना शहरात एक नवचैतन्य निर्माण करून प्रत्येक वसाहतीतील स्वच्छतेसाठी जागरुक करण्यात आले ही अत्यंत उल्लेखनीय बाब आहे. शासन व प्रशासनाच्या वतीने स्वच्छता अभियान राबवून देशात जालन्याचे एक स्वतंत्र स्थान निर्माण केले.
परंतु, स्वयंस्फूर्तीने महिलांनी वसाहतीमध्ये जाऊन महिलांना जागरूक करून कार्यक्रम राबविण्यास प्रेरित केले. याचे संपूर्ण श्रेय महिला मंडळाचे कार्य प्रशंसनीय व उल्लेखनीय आहे. महिला मंडळाच्या अध्यक्षा रंजना सिरसाठ यांनी जो उपक्रम राबवून आमचा सन्मान केला.
असे संगीता गोरंट्याल म्हणाल्या. यावेळी नगर परिषदचे स्वच्छता कर्मचारी अरूण वानखेडे, अरूण सरदार, अनिल वाघमारे, राहुल सुरडकर, साळवे पहेलवान, संजय नावकर, सचिन खरात, तुषार निकम, संजय सिरसाठ, चंद्रकांत साळवे, सुभाष राठोड, सतिश ठोके, जयवंत मोरे, मिलिंद इंगळे, दुर्योधन बालराज, भाग्यश्री पगारे, सुमन शिंदे, सरूबाई मोरे, माधुरी वेव्हल, शशिकला मगरे, प्रेमिला सरोदे, सुलोचना नावकर, सत्यभामा वाघमारे, कमल पारधे, मंगलताई उगले, वंदना घेवंदे, मंगलबाई म्हस्के, कमबाई सरोदे, साळवे, भदरगे, दवंडे, पडघन, सदानंद टवले, तुकाराम सरदार, संदिपान दासुद, सुभाष पोगरे, सोनाजी नावकर, भिमराव ताबारे, संजय वेव्हल, भास्कर घेवंदे, दासुद बाबा, हिंमतराव म्हस्के, नारायण निकम, गायकवाड यांच्यासह महासंघाचे पदाधिकारी, परिसरातील नागरिकांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.