आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन‎:सीना नदीतपात्रात स्वच्छता‎ मोहीम, वृक्षांची लागवड हाेणार‎

जालना21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎ जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड‎ यांच्या नेतृत्वात रविवारी सकाळी‎ ६.३० वाजता सीना नदी पात्रात‎ स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.‎ जालना बसस्थानक पुल ते हनुमान‎ घाट अशी मोहीम राबवण्यात‎ आली. यावेळी खुद्द‎ जिल्हाधिकाऱ्यांनी यांनी कचरा‎ संकलनात सहभाग नोंदवला.‎ दरम्यान, या वाढीव नदी पात्रात‎ नागरिकांनी निर्माण केलेल्या वृक्षांची‎ लागवड केली जाणार असून हर घर‎ नर्सरी यातून रोपे निर्माण करणार‎ आहे. नागरिकांनी हर घर नर्सरी ही‎ संकल्पना राबवावी असे आवाहन‎ जिल्हाधिकारी डॉ. विजय राठाेड‎ यांनी केली.‎

रविवारी सकाळी सात वाजता‎ सुरू झालेल्या मोहिमेला‎ जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड,‎ मुख्याधिकारी संतोष खंाडेकर,‎ तहसीलदार श्रीकांत भुजबळ,‎ उद्योजक सुनिलभाई रायठठ्ठा,‎ रमेशभाई पटेल, समस्त महाजन‎ ट्रस्ट चे उदय शिंदे आदींसह‎ जालनेकरांची उपस्थिती होती.‎ यावेळी जालना बसस्थानक पुल ते‎ हनुमान घाट या दरम्यान सीना नदी‎ पात्रात पाहणी करून स्वच्छता‎ करण्यात आली. यावेळी विविध‎ सामाजिक संघटना तसेच उद्योजक‎ सहभागी झाले होते.‎

बातम्या आणखी आहेत...