आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छता मोहीम:सीना नदीपात्रामध्ये‎ आज स्वच्छता मोहीम‎

जालना24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎ जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड‎ यांच्या नेतृत्वात रविवारी (५ मार्च)‎ सकाळी ६.३० वाजता सीना‎ नदीपात्रात स्वच्छता मोहीम‎ राबवण्यात येणार आहे. ही मोहीम‎ संतोषीमाता मंदिर पूल ते बसस्थानक‎ पूल परिसरात राबवली जाणार आहे.‎ जालन्यात कुंडलिका सीना नदी‎ पुनरुज्जीवन अभियान राबवण्यात‎ येत असून याअंतर्गत नद्यांना नवे रूप‎ देण्याचे काम सुरू आहे.

कुंडलिका‎ सीना रिज्युव्हेशन अँड डेव्हलपमेंट‎ फाउंडेशन आणि समस्त महाजन‎ ट्रस्ट मुंबई यांच्या माध्यमातून तसेच‎ जालनेकरांच्या पुढाकारातून जालना‎ परिसरातील नैसर्गिक वारसा जिवंत‎ करण्याचे काम श्रमदानातून हाती‎ घेण्यात आले आहे. यापूर्वी‎ कुंडलिका नदी, पारसी टेकडी या‎ ठिकाणी श्रमदान मोहीम राबवण्यात‎ आली आहे. या मोहिमेसाठी‎ नदीपात्रातील गाळ तसेच कचरा‎ काढून पाण्यासाठी मार्गही तयार‎ करण्यात आला आहे.‎

बातम्या आणखी आहेत...