आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:हवामानास अनुकूल पिकांची निवड करावी; प्रकल्प संचालक विजयअण्णा बोराडे यांचे आवाहन

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामीण भागामध्ये शेतीवर अवलंबून असलेली लोकसंख्या जास्त आहे, परंतु शेतीमधून निघणारे उत्पन्न हे कमी असल्यामुळे शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदललेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामानास अनुकूल अशा पिकांची निवड करून आर्थिक स्थैर्य साधावे, असे आवाहन मराठवाडा शेती साहित्य मंडळाचे विश्वस्त तथा कृषी विज्ञान केंद्राचे प्रकल्प संचालक विजयअण्णा बोराडे यांनी केले आहे.

कृषी विज्ञान मंडळाच्या वतीने कृषी विज्ञान केंद्र खरपुडी येथे मासिक चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मार्गदर्शन करताना अध्यक्षस्थानावरून बोराडे बोलत होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून रोहित ॲग्रो इंडस्ट्रीचे इंजिनिअर सचिन कवडे तसेच जालना येथील शिवतारे ॲग्रो इंडस्ट्रीचे नंदकिशोर गिरी हे उपस्थित होते. बोराडे म्हणाले की, बांबू पिकाची लागवड करण्यासाठी तांत्रिक मार्गदर्शन घेऊनच वाणांची निवड करावी. इंजि. कवडे म्हणाले की, बीबीएफ तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची पेरणी करावी.

विविध प्रकारचे यंत्र तसेच विविध प्रकारच्या उत्कृष्ट वाणांची निवड करून शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीचा पोत ओळखून जमिनीमध्ये पेरणी करून घ्यावी. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना समोर ठेवून विविध प्रकारचे छोट्या प्रकारचे यंत्रांची निर्मितीही करण्यात आलेली असून त्यात यंत्रांचा वापर महिला, शेतकऱ्यांनी करावा. भविष्यामध्ये महिलांना डोळ्यासमोर ठेवून छोट्या-छोट्या यंत्रांची निर्मिती करण्यात येणार असून त्यासाठी ग्रामीण भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक स्थैर्य वाढू शकते असेही त्यांनी सांगितले. आर. एफ. शेख यांनी खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी सर्व प्रकारच्या पिकांसाठी पीक विमा भरावा, असे त्यांनी आवाहन केले.

बातम्या आणखी आहेत...