आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंद:महापुरुषांच्या होणाऱ्या अवमान प्रकरणी बंद

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह जोतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या महापुरुषांचा वारंवार होणारा अवमान थंाबावा. तसेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्याविरोधात कारवाई करावी या मागणीसाठी बुधवारी ८ नोव्हेंबर रोजी जालना जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा क्रांती मोर्चा, समविचारी पक्ष तसेच विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची जालना बंदच्या नियोजनाची बैठक घेण्यात आली. बंदला जिल्हा होलसेल किराणा मार्केट, भुसार मार्केट, भाजी मार्केट, खत मार्केट, हमाल-मापाडी, वकील संघ, काँग्रेस असंघटित कामगार संघटना, मराठा महासंघ, मराठा सेवा संघ इतर संघटनांनी पाठिंबा दिला.

बातम्या आणखी आहेत...