आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उभ्या पिकांना बसला पावसाचा तडाखा:तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस; भरपाईची मागणी

जालना23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवार व रविवारी झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे जालना तालुक्यात कापूस, तूर, ऊस, सोयाबीन, मूग, उडीद, मोसंबी, द्राक्ष, डाळिंब पिकांचे मोठे नुकसान झाले असून शासनाने तत्काळ पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी युवा सेनेचे तालुकाप्रमुख तथा मोतीगव्हाणचे सरपंच गणेश मोहिते यांनी केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यामार्फत निवेदन पाठवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मोतीगव्हाण, साळेगाव, दहिफळ, मानेगाव, निरखेडा, मौजपुरी, पारेगाव, पाडेगाव, सांवगी, बाजीउम्रद, पहेगावसह अनेक गावांतील उभ्या पिकांना पावसाचा तडाखा बसला असून शेतजमीन खरडून गेली आहे. नदी, नाले तर प्रवाही झाले असून विहिरी, कूपनलिका, तलाव तुडुंब भरले आहेत. शेताला अक्षरश: तळ्याचे स्वरूप आले आहे. त्यामुळे शेतातील उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या भागाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी, नसता युवा सेनेच्या वतीने रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा मोहिते यांनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...