आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेगारी:माजी नगरसेवकाच्या तक्रारीने पोलीसांना कारवाईसाठी ‘क्लू’, गतवर्षी अनैतीक व्यवसायावर भोकरदन रोडवर झाल्या कारवाया

जालना4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका माजी नगरसेवकाने राजूर रोडवरील काही ढाब्यांवर अनैतीक व्यवसाय सुरु असल्याची तक्रार केली होती. या तक्रारीमुळे जालना पोलीसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला कारवाईसाठी एकप्रकारे ‘क्लू’ मिळाला आहे. चालू असलेल्या या अवैध धंद्यांबाबत कारवाई करतात की, बघ्याची भूमीका घेतात हे आगामी काळात पाहायला मिळेल. गतवर्षात याच रोडवरील दोन हॉटेलमध्ये अशा प्रकारचे व्यवसाय चालत असल्याने कारवाया झाल्या होत्या. परंतू, यानंतर एकही या भागात कारवाई न झाल्यामुळे या अवैध व्यवसायांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

जिल्ह्यात अवैध धंदे सुरु राहील्यास त्याचा सर्वसामान्य जनतेला त्रास सहन करावा लागतो. पोलीसांकडून कारवाया झाल्यास असे अवैध धंद्यांवर आळा बसतो. परंतू, पोलीसांकडून कारवाया न झाल्यास हे अवैध धंदे वाढून अनेक समस्यांचा सामना करवा लागतो. दरम्यान, वेश्या व्यवसाय सुरु राहील्यास त्या भागांत अनेक गुन्हेगारी वाढण्याचीही शक्यता असते. जिल्ह्यात चोरुन-लपून काही ठिकाणी हे अवैध व्यवसाय सुरु असतात. राजूर-भोकरदन रोडवरील काही ढाबे, हॉटेलमध्ये अनेक वर्षांपासून हे व्यवसाय सुरु असल्याच्या घटना घडल्या आहेत. घाणेवाडीजवळील एका ढाब्यावर तर भोकरदनजवळील दोन ढाब्यांवर अशा प्रकारच्या कारवाया झालेल्या आहेत.

तत्कालीन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हे गुन्हे उघडकीस आणले होते. परंतू, यानंतर मात्र, आता पोलीसांकडून एकही कारवाई झालेली नाही. दरम्यान, काही दिवसापूर्वीच एका माजी नगरसेवकाने काही हॉटेल व ढाब्यांवर हा अनैतिक व्यवसाय सुरु आहेत, अशी तक्रार केली होती. दरम्यान, एका लोकप्रतिनिधीने तक्रार करणे, यापुर्वीच याच रोडवर अशा प्रकारच्या पोलीसांनी कारवाया केलेल्या असल्यामुळे आता पोलीस या भागात कारवाया करतील का, काही लोकप्रतिनिधींचेही हॉटेल या रोडवर आहेत. यामुळे माजी नगरसेवकांची ही तक्रार चांगलीच चर्चेत आली आहे. अद्यापही या रोडवर कारवाई झालेली नाही. पोलीस कारवाई करतात की, अवैध व्यवसायांना पाठबळ देतात, हे येणाऱ्या काळात पाहायला मिळेल.

तक्रारीबाबत चंदनझीरा पोलीस तपास करताहेत
अवैध धंद्याबाबत पोलीसांकडून आलेल्या तक्रारीनुसार तपास केल्या जात असतो. आलेल्या तक्रारींचा अभ्यास करुन पुढील कारवाई केल्या जात असते. अनैतिक व्यवसाय होत असल्याच्या माहितीनुसार चंदनझीरा पोलीस तपास करीत आहेत.
निरज राजगुरु, डिवायएसपी, जालना.

सदर बाजार, कदीम ठाण्याच्या हद्दीत वाढले अवैध व्यवसाय
जालना जिल्ह्यात पोलीसांच्या दुर्लक्षामुळे जिल्ह्यात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. अवैध दारु विक्री, जुगारासारखे प्रकारही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. जालना शहरातील सदर बाजार, कदीम, चंदनझीरा पोलीसांच्या हद्दीत अवैध गुटखा विक्रीही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.

अवैध धंद्यांबाबत पोलीसांच्या बोटावर मोजण्याइतक्या कारवाया
जालना जिल्ह्यात चालू वर्षातील दोन महिन्यांमध्ये १२५ जुगाराच्या घटना घडल्या आहेत. तर दारुबंदीच्या १६३ व ईतर १३९ घटना घडल्या आहेत. मागील वर्षीपेक्षा यात १९९ घटनांची वाढ झाली आहे. यामुळे अवैध धंदे वाढतच चालले आहेत. यामुळे पोलीसांना कारवाया करण्याची गरज निर्माण झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...