आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माकपच्या वतीने श्रद्धांजली सभा:कॉ. कुमार शिराळकर त्याग, संवेदना व निष्ठतेचे उत्तम उदाहरण ; सावंत

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुमार शिराळकर म्हणजे सर्वच चळवळीचे मार्गदर्शक होते. पवई येथील आयआयटी इंजिनिअरिंग पदवी मध्ये सुवर्णपदक मिळवलेला तरुण आदिवासी, दलित, कष्टकरी यांच्यावर तळोदा-शहादा भागातील जुलमी जमीनदारांच्या विरोधात जाऊन तेथील आदिवासींना न्याय देण्याच काम कॉ. कुमार यांनी केले.कॉ. कुमार शिराळकर त्याग, संवेदना व निष्ठतेचे उत्तम उदाहरण असल्याचे मत कॉ. अण्णा सावंत यांनी व्यक्त केले.

सिटू भवन जालना येथे माकपचे पॉलीट ब्युरो मेम्बर कॉ. कोंडीयारी बालकृष्णन, कॉ. कुमार शिराळकर, तसेच नंदुरबार येथील कॉ. नारायण ठाकरे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कॉ. सावंत म्हणाले की, शिराळकर यांंच्यावर तेथील जमिनदारांच्या गुंडानी हल्ले हल्ले केले, पण कुमार शिराळकर थोडे न डगमगता तेथील गोरगरीब आदिवासींच्या न्याय हक्कसाठी संघटन करून सतत लढत राहिले.

त्यांचे काम फक्त त्या भागातच नसून ज्या ठिकाणी अन्याय होत असेल, त्याठिकाणी कॉम्रेड जात. जातीय अत्याचाराच्या विरोधात त्यांच्या नेतृत्वाखाली पुणे ते खर्डा पायी मार्च निघाला. त्यावेळी ७० वर्ष वय असताना पायी चालले. त्यांचं जीवनच त्यांनी गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी समर्पित केले होते. ते डाव्या पक्षात असले तरी त्यांना तरी त्यांचा संबंध पुरोगामी व समविचारी संघटनांसोबत जैव संबंध होता. शहादा चळवळ, दलित पँथर, नामांतराचा लढ्याशी ते जोडले गेले होते. त्यांच्यासंबंधी साधी राहणी उच्च विचारसारणी या उक्तीचा प्रत्यक्ष प्रत्येय म्हणजे कॉ. कुमार शिराळकर. त्यांनी स्वतः साठी कुठल्याही प्रकारचा आग्रह केला नाही असे श्रद्धांजली पर मत व्यक्त करताना कॉ. अण्णा सावंत म्हणाले.

यावेळी बोलताना डॉ. सुनंदा तिडके यांनीही त्याच्या सोबत काम करतानाच्या आठवणींना उजाळा दिला. अनिल मिसाळ यांनी श्रद्धांजली सभेचे संचालन केले. यावेळी सिटूचे राज्य सचिव कॉ. अण्णा सावंत, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. सुनंदा तिडके, कांचन वाहुळे, शेतमजूर युनियनचे जिल्हा सचिव सचिन थोरात, सहसचिव बदीपक दवंडे, एसएफआयचे राज्य उपाध्यक्ष अॅड. अनिल मिसाळ, जिल्हा सेक्रेटरी गौरव चव्हाण, मदन एखंडे, हरिश्चंद्र लोखंडे, संतोष पाटोळे, प्रभाकर कुलकर्णी, पार्वती ममदाबादे, रेखा काकडे यांच्यासह सिटू, शेतमजूर युनियन, एसएफआय, डीवायएफआयच्या कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...