आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:दिवसभरात 25 हजार गणेशमूर्तींचे संकलन ; सृष्टी फाउंडेशनसह अनेक संस्थांचीही साथ

जालना24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पर्यावरणपूरक विसर्जनासाठी जिल्हा प्रशासनाने यंदा पुढाकार घेतला. त्याला सृष्टी फाउंडेशन व इतर स्वयंसेवी संस्थांनी मोठी मदत केली. यातून मोती तलावावर विसर्जनाच्या दिवशी दिवसभर २५ हजार गणेशमूर्ती संकलित करण्यात आल्या. नंतर या मूर्तींचे विधिवत पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन करण्यात आले.

पर्यावरण क्षेत्रात भरीव कार्यरत सृष्टी फाउंडेशनच्या वतीने जिल्ह्यात सर्वप्रथम प्लॕास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती दान म्हणून घेण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला. कालांतराने अनेक सामाजिक संस्थांचे यात सहकार्य मिळत गेले. या उपक्रमाचे महत्त्व लक्षात घेऊन नंतर प्रशासनाने हा उपक्रम हाती घेण्यास सुरुवात केली. यासाठी मोती तलावावर विशेष व्यवस्था करण्यात आली. यंदा जिल्हाधिकारी डाॕॅ. विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. पालिकेचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी या उपक्रमात सहकार्य करताना आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या. मोती तलावातील पाण्याचे प्रदूषणापासून बचाव करण्यासाठी तसेच तलावातील जलचर प्रदूषणापासून वाचवण्यासाठी हा उपक्रम घेत असल्याचे सांगितले. या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद देत जवळपास २५ हजार गणेश मूर्ती दान केल्या. यावेळी सृष्टी फाउंडेशनच्या अध्यक्ष संध्या जागीरदार, प्रकल्प समन्वयक डॉ. प्रतिभा श्रीपत, सचिव संजीवनी देशपांडे, विद्या पाटील, जयश्री कुंजुके, मंजू क्षीरसागर, कविता नरवडे यांनी सहकार्य केले. त्या ठिकाणी दिवसभर सदस्य उपस्थित राहून हा उपक्रम यशस्वीपणे राबवत होते.

पर्यावरणपूरक पद्धतीने मूर्तींचे विधिवत विसर्जन
प्लास्टर ऑफ पॅरिसचे थेट पाण्यात विसर्जन करण्याऐवजी मूर्ती दान करण्याच्या संकल्पनेला गणेश भक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे येथे दिवसभरात २५ हजार मूर्ती संकलित झाल्या. पालिकेच्या वतीने विधिवत व पर्यावरणपूरक पद्धतीने या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. गणेश भक्तांनी हा उपक्रम पर्यावरणपूरक असल्याचे सांगून याचे महत्त्व अधोरेखित केले.

बातम्या आणखी आहेत...