आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी गुरुवारी घनसावंगी तालुक्यातील रांजणी, मासेगाव, डहाळेगाव, घोंशी, घनसावंगी या गावांत विविध विकास कामांची पाहणी केली. या प्रसंगी त्यांनी झाडे टिकली तर आपण टिकू यासाठी वृक्षलागवड आणि त्याचे संवर्धन करण्यावर भर देण्याचे आवाहन केले.
मासेगाव येथील कार्यक्रमाची सुरुवात डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते वृक्षाचा वाढदिवस साजरा करून केली. देवराई प्रकल्प पाहणी आणि नवीन वृक्ष लागवड तसेच विद्यार्थी यांच्या सहायाने सिडबॉल तळ्यातील हनुमान टेकडी मंदिर परिसरात फेकण्यात आले. डहाळेगाव येथे कानिफनाथ टेकडीवर गावकरी आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने वृक्षलागवड करण्यात आली. घोन्शी या ठिकाणी ड्रॅगन फळलागवड शेतीची पाहणी करून इ-पिक पाहणी ॲप कसे भरायचे याबाबत शेतकरी यांच्याकडून प्रत्यक्ष माहिती भरून घेण्यात आली.
यावेळी त्यांनी औजार बँकेची पाहणी केली. घनसावंगी येथील नगर पंचायतीस भेट देऊन नवीन वाचनालयाच्या कामाची पाहणी केली. नाना नाणी पार्क येथील बागेस भेट देऊन समाधान व्यक्त केले. घनसावंगी येथील डिजिटल ग्रंथालयास भेट देऊन स्पर्धा परीक्षांबद्दल विद्यार्थ्यांत जागृती निर्माण करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी रोहयो उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर, तहसीलदार नरेंद्र देशमुख, नगराध्यक्ष पांडुरंग कथले, मुख्याधिकारी विक्रम मांडुरके, तालुका कृषी अधिकारी राम रोडगे, नायब तहसीलदार गौरव खैरनार, संबधित गावांचे सरपंच, इतर संबधित शासकीय अधिकारी कर्मचारी, जीवनवृक्ष टीमचे नारायण देवकते परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.