आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील जीवरेखा नदीच्या तीरावर वसलेल्या पुरातन भोलेश्वर महादेव मंदिराची रंगरंगोटी सामाजिक कार्यकर्ते जनार्दन झोरे स्वखर्चातून करीत आहेत. सोमवारी या कामाचा प्रारंभ राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रामधन कळंबे, रेणुका देवी संस्थानाच्या संचालिका सरस्वतीबाई देशमुख, दत्त संस्थानचे अध्यक्ष देवराव देशमुख, तंटामुक्तीचे अध्यक्ष विष्णू जमधडे, रामदास महाराज, गोविंद शिराळे यांची उपस्थिती होती.
झोरे यांनीही माळी समाजासाठी स्मशानभूमीचे शेड बांधून दिला असून आता भोलेश्वर महादेव मंदिराची रंगरंगोटी करीत आहेत. जनार्दन झोरे हे सामाजिक उत्तरदायित्व पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असणारे व्यक्तिमत्त्व असून त्यांच्यामुळेच स्मशानभूमीचे काम पूर्ण झाल्याचे कळंबे म्हणाले. यावेळी दत्त संस्थान संचालक प्रा. दत्ता देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजू करवंदे, निराधार समिती सदस्य किशोर कांबळे, ग्रामपंचायत सदस्य गणेश गाडेकर, पांडुरंग बोरसे, गणेश सपकाळ, भगवान पवार, अरुण पंडित, रामभाऊ शेवाळे, रामदास डोमाळे, महादू इंगळे, सुलाबाई बोराडे, सरस्वतीताई देशमुख, अशोक जाधव, तुकाराम महाराज, मनोज पंडित, विशाल झोरे, छगन मुळे, बाबासाहेब जमधडे, रवी खरात, कौशल गायमुखे, अमोल जमधडे यांची उपस्थिती होती. यावेळी भाविकांनी झोरे यांचा सत्कार केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.