आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कला:परतूरला विविध विषयांवर रंगभरण स्पर्धा; छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल, बचपन प्ले स्कूलचा पुढाकार

परतूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा,मुलांमध्ये सामाजिक दृष्टिकोन वाढीव लागावा या हेतूने शहरातील छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल ड्रीम स्कुल आणि बचपन प्ले स्कुल यांच्या विद्यमाने रविवारी विविध विषयांवर रंगभरण स्पर्धा घेण्यात आल्या. स्वच्छ भारत अभियान, भारतीय संस्कृतीचा वारसा, पारंपारिक सण, झाडे लावा-झाडे जगवा आदी विषयांवर चित्रे देऊन ती विद्यार्थ्यांना रंगवण्यासाठी देण्यात आले होते.

अशा स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कला गुणांना चालना देण्या बरोबर त्यांच्या मध्ये विविध सामाजिक जाणिवा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती मुख्याध्यापिका मीनाक्षी काळुंके यांनी दिली आहे. रविवारी सकाळी १० वाजता आयोजित स्पर्धेत तालुक्यातील विविध गावातील विद्यार्थी सहभागी झाले होते. वयोगटानुसार विद्यार्थ्यांचे वेगवेगळे गट तयार करण्यात आले होते, गटानुआर वेगवेगळे विषय विद्यार्थ्यांना देण्यात आलव होते.

३ एप्रिल रोजी या स्पर्धेचा निकाल घोषीत करण्यात येणार आहे. विजेत्यांना सुवर्ण पदक, रजत पदक आणि कांस्य पदक देण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी संजय व्यवहारे, लंका भवर, सीमा सरदार, पुरुषोत्तम मगर, रवी गोरे यांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...