आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीज बिल:जास्तीची वीज देयके रद्द करून युनिटप्रमाणे ग्राहकाला बिल देण्याचे आयोगाचे आदेश

भोकरदन4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जून २०१९ ते मार्च २०२१ या कालावधीतील सर्व वीजदेयके रद्द करून तक्रारदारांना प्रतिमाह २१२ युनिटप्रमाणे वीज देयके द्यावीत असे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

भोकरदन येथील रहिवासी व्यंकटराव संतुकराव देशमुख (मृत) यांचे चिरंजीव गणेश देशमुख यांनी जास्तीचे वीज देयके रद्द करून त्यावरील व्याज व दंड रद्द करावा यासाठी वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी खुलासा अभियंता यांच्यासह अन्य अधिकारी यांच्या निर्णयास जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग जालना यांच्याकडे दाद मागितली होती. जून २०१९ ते मार्च २०२१ या कालावधीसाठी तक्रारदार यांनी भरणा केलेली रक्कम सुधारित वीज देयकात समायोजित करावी याबाबत तक्रारदारांना खुलासा करावा आणि तक्रारदार यांना झालेल्या मानसिक शारीरिक व त्रासापोटी तक्रारीचा खर्च ७ हजार रुपये गैरअर्जदार यांनी द्यावेत. तक्रारदार यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत असून तक्रारदारास झालेल्या मानसीक शारीरिक त्रासापोटी तक्रारीचा खर्च ७ हजार रुपये खर्च द्यावा असे आदेश आयोगाने दिले आहेत. तक्रारदार यांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते. गैरअर्जदार यांना आदेश देण्यात येते की, त्यांनी तक्रारदारचे जून २०१९ ते मार्च २०२१ या कालावधीसाठीचे सर्व वीज देयके रद्द करावीत.

सदर कालावधी करता तक्रारदारास प्रतिमाह २१२ युनिटप्रमाणे सुधारित विज देयक यावीत, सदर वीज देयकावर कोणताही दंड व व्याज दर आकारू नये, गैरअर्जदार यांना आदेश देण्यात येते की त्यांनी जून २०१९ ते मार्च २०२१ या कालावधीसाठी तक्रारदारस वीज देयकापोटी भरणा केलेली रक्कम सुधारित विज देयकात समायोजित करावी असे आदेश आयोगाने वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

बातम्या आणखी आहेत...