आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोपी ताब्यात:खून केला; पुरावा राहू नये म्हणून अंगठ्या काढून नेल्या

जालना13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैशाचा तगादा लावत असल्याने महिलेचा गळा आवळून खून केल्याची घटना घनसावंगी तालुक्यातील बोधलापुरी परिसरात घडली होती. या प्रकरणात एका आरोपीला घनसावंगी पोलिसांनी निष्पन्न केले आहे. दरम्यान, खून केल्यानंतर पोलिसांना तपासासाठी काही पुरावा राहू नये म्हणून आरोपीने चपला, हातातील अंगठ्याही काढून नेल्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिली. महादेव विठ्ठल कडूकर (तीर्थपुरी, ता. घनसावंगी) असे संशयित आरोपीचे नाव आहे.

बोधलापुरी शिवारातील एका पुलाखाली चेहरा छिन्नविछिन्न केलेला मृतदेह आढळून आला होता. चेहऱ्यावर जखमा असल्यामुळे या महिलेची ओळख पटणे शक्य होत नव्हते. घटनास्थळी मिळालेले कपडे, गोंदलेल्या नावाआधारेच पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन व त्यांचे पथक तपास करीत होते. महिलेची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी शोधपत्रिका व्हिडिओ तयार करून त्याआधारेच ओळख पटवण्याचे काम करीत हाेते. यातून त्या मृत महिलेच्या नातेवाइकांनी घनसावंगी पोलिसांशी संपर्क साधला. संशयिताने दिली खुनाची कबुली : घनसावंगी पोलिसांनी संशयित महादेव कडूकर यास ताब्यात घेऊन विचारणा केली असता, या खुनाची कबुली दिली.

मृत महिला पैसे मागत असल्यामुळे तिचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिली. पोलिस अधीक्षक अक्षय शिंदे, अपर पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख, डीवायएसपी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन, उपनिरीक्षक प्रदीप डोलारे, संतोष मरळ, बागलानी, रामचंद्र खलसे, त्र्यंबक राठोड, नामदेव राठोड, रमेश राऊत, हरीष वाघमारे आदींनी तपास केला आहे.

बातम्या आणखी आहेत...