आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजालना शहरात राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे अत्यंत सुरेख नियोजन करण्यात आले होते. तालुका, राज्य व देश पातळीवर कबड्डीचा विकास आणि प्रसिद्धीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करणार असून, पुढील सलग तीन वर्ष म्हणजेच सन २०२६ पर्यंत दरवर्षी राज्यस्तरीय आणि देशपातळीवर स्पर्धा आयोजनासाठी आपण कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही आमदार राजेश राठोड यांनी दिली. राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. महात्मा ज्योतिबा फुले सामाजिक कार्य सेवाभावी संस्था आणि राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालय जालना यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय युवा दिन व राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त सलग तीन दिवस राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालयाच्या मैदानावर पार पडलेल्या जिजाऊ कबड्डी चषक या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेतील पुरुष गटाचे विजेतेपद औरंगाबाद येथील भारतमाता क्रीडा मंडळाने तर महिला गटाचे विजेतेपद अहमदनगर जिल्ह्यातील दहीगव्हाण येथील स्व. मारोतराव घुले प्रतिष्ठानने पटकावले. दोन्ही गटातील अंतिम सामने अत्यंत अटीतटीचे आणि चित्तथरारक झाले. महिलांच्या गटात सावित्रीच्या लेकीतील अंतिम झुंज हृदयाचा ठोका चुकवणारी ठरली. सामना बरोबरीत सुटल्यानंतर दोन्ही संघांना ५ चढाईची संधी देण्यात आली, त्यात स्व. मारोतराव घुले प्रतिष्ठानने बाजी मारली. मान्यवरांच्या हस्ते दोन्ही गटातील विजेत्या संघाला ३१ हजार, उपविजेत्या संघाला २१ हजार, तृतीय संघाला ११ हजार तर चतुर्थ संघाला ७१०० रुपयाचे बक्षीस व स्मृतिचिन्ह मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
पारितोषिक वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी आमदार राजेश राठोड हे होते. विशेष अतिथी म्हणून देशातील प्रथम मंडळ स्तंभनिर्माते तथा माजी आमदार डॉ. नारायणराव मुंढे, प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष भास्कर आंबेकर, बीडच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक तथा कबड्डीत महाराष्ट्राचे राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करणाऱ्या सुरेखा नागरगोजे-धस, छत्रपती पुरस्कार विजेते तथा महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे कोषाध्यक्ष मंगल पांडे, सामाजिक कार्यकर्त्या सुषमा पायगव्हाणे, मनीषा काटकर उपस्थित होत्या.
तर व्यासपीठावर चषकाचे मुख्य संयोजक प्रा. सत्संग मुंढे, सुघोष मुंढे, संयोजन समितीचे सुदामराव सदाशिवे, प्राचार्य डॉ. सुनंदा तिडके, आश्लेषा इंग्लिश स्कूलच्या संचालिका शुभदा मुंढे आदींची उपस्थिती होती. आ. राजेश राठोड म्हणाले, मी हा खेळ टीव्हीवर बघायचो. मात्र, प्रा. सत्संग मुंढे यांनी कबड्डी हा खेळ डोळ्याने पाहण्याची संधी प्रत्यक्ष उपलब्ध करून दिली. प्रथमच राज्यस्तरावर आयोजित केलेल्या या स्पर्धेच्या यशाचे श्रेय राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालयाच्या स्टाफला जाते. खिलाडूवृत्ती ही मानसिकता असते. जिंकणाऱ्यांनी आनंदोत्सव साजरा करावा असे माजी नगराध्यक्ष भास्कर अंबेकर म्हणाले. पंच व गुण लेखकांचाही सत्कार विजेते, उपविजेते, तृतीय, चतुर्थ संघ आणि उत्कृष्ट खेळी करणाऱ्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. जालना जिल्ह्यात कबड्डी रुजवण्यासह टिकविण्यासाठी झटणारे खेळाडू, सामन्याचे पंच, गुणलेखक यांचा सत्कार करण्यात आला.
पुढील वर्षी १२ ते १४ जानेवारीत स्पर्धा राष्ट्रमाता महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यामुळे स्पर्धा यशस्वी झाली. यापुढेही राज्यस्तरीय स्पर्धेच्या आयोजनासाठी आमदार राजेश राठोड हे पाठीशी राहतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.