आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजाफ्राबाद तालुक्यात नावीन्यपूर्ण उपक्रमातून शिक्षकांनी गरिबांच्या विद्यार्थ्यांना मोफत धडे देण्याचा उपक्रम अनेक वर्षापासून कायम ठेवला आहे. नुकतेच गौरी शंकर आश्रम येथे विद्यार्थ्यांना एनएमएमएस परीक्षेसाठी ऑनलाईन वर्गाचा सराव तसेच विविध पेपर सोडवून घेण्यात येत आहे. कोणत्याही फी विना सुरू असलेला उपक्रम कौतुकास्पद ठरत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची गोडी निर्माण व्हावी म्हणुन हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडण्यासाठी उपक्रमशील शिक्षकांची टीम असलेला जाफराबाद स्पर्धा परीक्षा विचार मंच दरवर्षी काहीतरी वेगळे करत असतो. त्यांनी आजपर्यंत विविध स्पर्धा परीक्षा ची तयारी विद्यार्थ्यांकडून करवुन घेत त्यांना संधी मिळवुन दिली आहे. नुकतेच त्यांनी नवोदय साठी विद्यार्थ्यांची तयारी आठ महिने ऑनलाईन तसेच ऑफलाईनच्या माध्यमातून तयारी करून घेतली. शिवाय परीक्षा जवळ आल्यानंतर गौरी शंकर महादेव आश्रम गोंधनखेडा येथे निवासी शिबीर घेत विद्यार्थ्यांकडून सराव करून घेतला. यानंतर आता सध्या गौरी शंकर आश्रम येथे विद्यार्थ्यांना एनएमएमएस चे सुरू असलेल्या ऑनलाईन वर्गाचा सराव तसेच सराव पेपर सोडवून घेण्यात येत आहे. या शिकवणी वर्गाला विद्यार्थी उपस्थित राहून पेपर सोडवण्याची पद्धत, पेपर मधील बारकावे या विषयी जाणून घेत आहे. विशेष म्हणजे सदरील वर्ग निशुल्क असून या शिकवणी वर्गाची कोणत्याही प्रकारची फीस नसल्याने पालकही समाधानी असून उन्हाळी शिकवणी मोफत घेतल्याचा आनंद मात्र शिक्षकांना होतो असल्याचे मत नारायण पिंपळे यांनी सांगितले. या शिकवणी वर्गानंतर शिष्यवृत्ती सराव घेण्यात येणार असून विविध स्पर्धा परीक्षांचे ऑनलाईन वर्ग घेण्यात येणार असल्याची माहिती पंजाब दांदडे व नारायण पिंपळे यांनी दिली. दरम्यान, ग्रामीण भागात विद्यार्थ्यांमध्ये मोठी गुणवत्ता असून केवळ धार देण्याचे काम असून ते योग्य वेळेत झाल्यास याचा नक्कीच विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.
स्पर्धा परीक्षेची ग्रामीणलाही सवय व्हावी म्हणून धडपड
विद्यार्थ्यांना मोफत शिकवण्याचा आनंद वेगळाच आहे. उन्हाळा सुट्टीचा सदुपयोग होऊन विध्यार्थ्याना पेपर सोडवण्यासाठी ची माहिती देण्याचा उपक्रम आम्ही हाती घेतला आहे. स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना शालेय जिवनापासूनच गोडी निर्माण व्हावी, विविध परीक्षेच्या तयारीची भिती या काळापासुनच जावी यासाठी शिक्षक मित्रांच्या वतीने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. कोरोना सारखा कठीण काळातही ही परंपरा कायम होती.
नारायण पिंपळे, गट समन्वयक जाफराबाद
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.