आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:वाघ्रुळ थांब्यावर बस थांबत नसल्याची तक्रार

वाघ्रुळ8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाघ्रुळ या मोठया बाजारपेठेच्या गावात सर्व बसेस थांबण्यासाठी अधिकृत बसथांबा आहे. परंतु काही आगारातील बसचालक जाणीवपूर्वक बसेस थांब्यावर थांबवत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. याकडे आगारप्रमुखांनी लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.या थांब्यावर नेहमीच प्रवाशी बसची वाट पहात उभे असतात. बस आली हात देखील दाखवतात परंतु अनेकदा चालक बस थांबवत नाहीत.

थांबवली तर थोडया अंतरावर जाऊन थांबवतात. यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. मागील अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरु आहे. शासनाने ज्येष्ठ नागरिकांना मोफत तर अर्धे तिकीटात प्रवास करण्याची सवलत दिलेली आहे. परंतू बसेस थांबत नसल्याने या योजनांचा प्रवाशांना लाभ मिळत नाही. वरिष्ठांनी लक्ष देऊन सर्व चालकांना या थांब्यावर बसेस थांबवण्याची सूचना करावी, अशी मागणी भागवत खरात यांच्यासह परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...