आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तक्रार:मुलींच्या वसतिगृहात सुविधा नसल्याची तक्रार

जालना13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील शासकीय समाज कल्याण वसतिगृहात मुलभूत सुविधा नसल्यामुळे या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या मुलींचे अतोनात हाल होत आहेत. अंघोळीसाठी गरम पाणी नाही, लाइटची सुविधा नाही, फॅन बंद आहे, नाश्त्यात किटक आढळतात, कच्च्या पोळ्या असतात, जेवण व्यवस्थीत नाही, चार्ट नुसार पोषक आहार दिला जात नाही. या बाबींकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी मनसेच्या शहराध्यक्ष वंदना सतीश खांडेभराड जिल्हाधिकाऱ्यांकडे यांनी केली आहे.

जालना शहरात मागासवर्गीय व आर्थीकदृष्ट्या मागासवर्गीय मुलीचे वसतीगृह आहे. या वसतिगृहात मुलभूत सुविधा नसल्या बाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. या विद्यार्थिनींसाठी सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या अनुषंगाने या पक्षाकडून पाठपुरावा केला जात आहे. दरम्यान, या वसतिगृहाची मनसेचे जिल्हाध्यक्ष रवि भैय्या राऊत, रेखा गंगातिवरे, वंदना खांडेभराड, शरद मांगदरे, राहूल रत्नपारखे, विलास तिकांडे, बाळू काळे आदींनी पाहणी केली आहे. समस्या न सोडवल्यास आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...