आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीईओंकडे तक्रार:उस्वदच्या सरपंच, ग्रामसेवकाविरोधात तक्रार

मंठाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील उस्वद ग्रामपंचायत अंतर्गत १५ व्या वित्त आयोगातून केलेल्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून भ्रष्टाचाराबाबत चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी या मागणीसाठी उस्वद येथील ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी सीईओंकडे लेखी तक्रार केली आहे.

उस्वद येथील ग्रामपंचायत अंतर्गत १५ व्या वित्त आयोग निधी मधून करण्यात आलेल्या कामाची माहिती तसेच ग्रामसभा व मासिक सभा बाबतची माहिती घेऊन कामाची सक्षम अधिकाऱ्याद्वारे प्रत्यक्ष पाहणी करून दोषींवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. कामे न करताच बिल उचलणाऱ्या सरपंच, ग्रामसेवक,विस्तार अधिकारी व अभियंता यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी यापूर्वीही करण्यात आली होती.

आता कार्यवाही न केल्यास आमरण उपोषणास बसण्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्य रंगनाथ कांबळे, संतोष नवघरे, मधुकर जाधव, मुकुंद पुरी, तारामती लोमटे, रूक्‍मीनबाई सरोदे, चंद्रभागा कांबळे, संगीता डोईफोडे आदींनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...