आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक व महिलांच्या तक्रारींची दखल तत्काळ घेतली जाईल; पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांचे प्रतिपादन

जालनाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

ज्येष्ठ नागरिक व महिलांच्या तक्रारींची दखल घेतली जाईल, असे नूतन पोलिस अधीक्षक अक्षय शिंदे यांनी सांगितले. मराठवाडा लिटिगंट्स असोसिएशनतर्फे पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मराठवाडा लिटिगंट्सअसोसिएशनचे अध्यक्ष सी.ए. गोविंदप्रसाद मुंदडा, उपाध्यक्ष विजय बगडीया, सचिव नरेंद्र मोदी, सहसचिव राजकुमार दायमा, कायदेप्रमुख अॅड. महेश धन्नावत यांची उपस्थिती होती. यावेळी शिंदे यांना निवेदन देण्यात आले.

त्यात म्हटले, जालना जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्याना सुचीत करण्यात यावे की, त्यांनी ज्येष्ठ नागरिक यांची यादी तयार करावी व त्यांची तक्रारीचे निवारण त्वरित करण्याबाबत कार्यवाही करावी, वेळप्रसंगी त्यांच्या घरी जाऊन त्यांची तक्रार नोंदवून घ्यावी. तसेच महिलांची तक्रार घेण्यासाठी विशिष्ट महिला पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती प्रत्येक पोलिस ठाण्यात करावी जेणे करून महिला आपल्या तक्रारी त्यांच्याकडे निर्भयपणे नोंदवु शकतील. तसेच तपास जलद गतीने करावे तसेच जप्त करण्यात आलेले मुद्देमाल परत देण्यासाठी किचकट प्रक्रिया असल्याने लोकांना त्यांचाच चोरी गेलेला मुद्देमाल परत मिळण्यास अडचण निर्माण होत आहे, त्यामुळे ही गैरसोय टाळण्यासाठी त्वरीत कारवाई करावी व न्यायालयाला त्या संदर्भात त्वरीत माहिती द्यावी. यावेळी मराठवाडा लिटिगंट्स असोसिएशनचे उपस्थित होते.