आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सण-उत्सव:उगवत्या सूर्याला अर्घ्य देऊन चार- दिवसीय छट उत्सवाचा समारोप

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या छट मातेच्या श्रद्धेच्या उत्सवाची आणि उपवासाची सांगता सोमवारी पहाटेच्या सूर्याच्या प्रथम किरणांचे दर्शन करुन व उगवत्या सूर्याला अर्घ्य देऊन उत्साहात करण्यात आली. व्यवसाय अथवा नोकरीसाठी जालना येथे ओडिशा, पश्चिम बंगाल, उत्तरप्रदेश, बिहार या राज्यातील उत्तर भारतीय बांधव राहतात. छटपूजाची परंपरा गेल्या कित्येक वर्षापासून अखंडितपणे सुरू आहे.

मात्र गेले दोन वर्ष कोरोनामुळे छट पूजा करता आली नव्हती. यावर्षी कोणतेही निर्बंध नसल्याने उत्तर भारतीय महिलांनी रविवारी सायंकाळी मोती तलावाच्या पाण्यात उतरून मावळत्या सूर्याची मनोभावे पूजा केली. आज सोमवारी उगवत्या सूर्याला अर्घ्य देऊन तीन दिवसीय उत्सव आणि उपवासाची सांगता करण्यात आली. यावेळी उत्तर भारतीय संघाचे अध्यक्ष सत्यजीत राय, संगठन मंत्री व प्रवक्ता शीतलाप्रसाद पांण्डेय, उपाध्यक्ष सुधीरकुमार सिंह, सचिव अॅड़. आंनदकुमार झा, कोषाध्यक्ष शिवसहाय सिंह, जय बजरंग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बिपुल राय, उपाध्यक्ष विनोद राऊत, शेषराव जाधव, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंदराव देशमुख, कोषाध्यक्ष अशोक पडुळ, ब्रिजेश राय, वंदेमातरम पांडेय, हिटलर सिंग, संतोष ठाकूर यांच्यासह पूर्वोत्तर राज्यातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. दिवाळीनंतर पाच दिवसांनी छठपूजा करण्याची परंपरा आहे.

ह्या उत्सवात संदर्भात अधिक माहिती देताना सत्यजित राय म्हणाले की, कार्तिक महिन्याच्या चतुर्थीपासून सुरू होणार्‍या उत्सवाची सांगता सप्तमीपर्यंत केली जाते. हा उत्सव ४ दिवसांचा असतो. जालना जिल्ह्यात छटपूजा २८ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान करण्यात साजरा करण्यात आला. भाविकांनी रविवारी विधीवत स्नान करून छटपूजेला सुरुवात केली. मोती तलाव येथे सूर्यास्तापासून उत्तर भारतीय नागरिक जमले होते. आज उगवत्या सूर्याला अर्ध्य देऊन समारोप करण्यात आला. या पूजेच्या माध्यमातून भारतीयांवर कोणतेही संकट येऊ नये, जीवनात भरभराटी, उन्नती राहण्यासाठी प्रार्थना करण्यात आली. यावेळी उत्तर भारतीय महिला, पुरुषांची मोठी उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...