आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभोकरदन येथील जनविकास शिक्षण संस्था संचलित श्री गणपती इंग्लिश, मराठी हायस्कूलच्या दरवर्षी प्रमाणे होणाऱ्या आंतरशालेय वार्षिक क्रीडा स्पर्धांचा समारोप झाला आहे. या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी पथसंचलन, लेझीम, डमरुसह कवायतींनी लक्ष वेधले आहे. भोकरदन पोलीस स्टेशनचे निरीक्षक रत्नजीत जोगदंड, केंद्र प्रमुख आर. एच. सोनवणे, संस्थेचे संचालक इंद्रजीत देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत शाळेच्या मैदानावर संपन्न झाला.सर्व प्रथम शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या टीमचे ध्वज हाती घेऊन सुंदर असे पथ संचलन करून सर्वांचे मने जिंकली यानंतर विविध खेळाचे प्रात्यक्षिके,मनोरे,लेझिम, डमरू यांच्या कवायती सादर करून सर्वांना मोहीत केले. यानंतर विजयी स्पर्धकांना सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
यावेळी पोलीस निरीक्षक रत्नदिप जोगदंड, गोपनीय शाखेचे बावसकर, केंद्र प्रमुख आर. एच. सोनवणे, संस्थेचे संचालक इंद्रजीत देशमुख, पी बी रोजेकर, प्राचार्य आर आर त्रिभुवन, मनोज लेकुरवाळे, सौ लता गायके, प्रशासकीय अधिकारी सोपान सपकाळ, पर्यवेक्षक जि व्ही जाधव, गजानन बुलगे, क्रीडा शिक्षक अशोक नवगिरे, गौतम खाडे यांच्या सह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यासह पालक व विद्यार्थी यांची उपस्थिती होती. शेवटी शिला पगारे यांच्या ग्रुपने सुमधुर आवाजात वंदे मातरम या गीताने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.