आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेध:थोर महापुरुषांविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्यांचा विविध संघटनांकडून निषेध

भोकरदन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ रविवारी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी, मंगलप्रभात लोढा यांचा स्वराज्य संघटना, भीम सेना, मुस्लिम युवा प्रतिष्ठान, महात्मा फुले समता परिषद यांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.

थोर महापुरुषांविषयी चुकीचे विधान करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी विकास जाधव, सूरज मव्हारे, दीपक जाधव, कृष्णा लोखंडे, विलास शिंदे, राजू इंगळे, राजू ढोके, मधुकर ढोले, ईश्वर इंगळे, रमेश जाधव, विशाल मिसाळ, सागर जाधव, सिद्धार्थ पगारे, कृष्णा साळवे, अमोल पगारे, सुशील वाघ, अक्षय गायकवाड, नितीन जोगदंडे, मंगेश पगारे, फैसल चाऊस, शेख सलीम, नारायण लोखंडे आदींनी केली.

बातम्या आणखी आहेत...